नितीशकुमार यांनी घेतली शरद पवारांची दिल्लीत भेट, निर्णयाला पवारांचे समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 02:51 PM2022-09-08T14:51:12+5:302022-09-08T14:51:48+5:30
गेल्या तीन दिवसांपासून मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी नितीशकुमार दिल्लीत ठाण मांडून आहेत.
नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपची साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दूरध्वनी आला होता. तेव्हा त्यांनी माझ्या निर्णयाचे समर्थन केले होते. तसेच आपण भाजपची साथ सोडली, हे चांगले काम केले, अशी टिप्पणी व्यक्त केली होती, अशी माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या तीन दिवसांपासून मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी नितीशकुमार दिल्लीत ठाण मांडून आहेत. बुधवारी अखेरच्या टप्प्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास २० मिनिटे या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. यावेळी आमदार कपिल पाटील उपस्थित होते. मोदी सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्रित येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.