केंद्र सरकारच्या बैठकांना नितीशकुमारांची दांडी; अधिकारी किंवा मंत्री करताहेत प्रतिनिधित्व
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 07:54 AM2022-12-29T07:54:55+5:302022-12-29T07:55:20+5:30
एनडीएशी संबंध तोडून महागठबंधनशी आघाडी केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री झालेले नितीशकुमार केंद्र सरकारच्या बैठकांना जाण्याचे टाळत आहेत.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा: एनडीएशी संबंध तोडून महागठबंधनशी आघाडी केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री झालेले नितीशकुमार केंद्र सरकारच्या बैठकांना जाण्याचे टाळत आहेत. नितीशकुमार यांनी नीती आयोगाच्या बैठकीपासून दूर राहिल्यापासून आजवर कोणत्याही बैठकीला हजेरी लावलेली नाही.
अधिकारी किंवा मंत्र्याला पाठवून राज्याचे प्रतिनिधित्व करण्यास सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ३० डिसेंबर रोजी कोलकाता येथे नमामि गंगे योजनेबाबत बैठक होत असून, त्यापासूनही नितीशकुमार दूर राहिले आहेत. या बैठकीसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना हजर राहण्यास सांगितले आहे. नितीशकुमार यांनी बैठकीला न जाण्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"