जनता दरबारात नितीश कुमार यांच्यावर चप्पल फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2016 08:02 PM2016-05-02T20:02:49+5:302016-05-02T20:06:27+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आज एका कार्यक्रमात चप्पल फेकून मारण्यात आली. जनता दरबारात समस्या घेऊन आलेल्या एका तरुणाने नितीश कुमारांवर चप्पल भिरकावली.
Next
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २ - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आज एका कार्यक्रमात चप्पल फेकून मारण्यात आली. जनता दरबारात समस्या घेऊन आलेल्या एका तरुणाने नितीश कुमारांवर चप्पल भिरकावली. चप्पल थेट नितीश कुमारांच्या छातीवर लागली. चप्पल भिरकावणारा तरूण अरवल जिल्ह्यातील राहाणारा असून त्याचेही नाव नितीश कुमार आहे. चप्पल फेकणा-या त्या व्यक्तीला पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.
नितीशकुमारवर चप्पल भिरकावणाऱ्या तरुणावर गोंधळ घालणे व सरकारी कामकाजात व्यत्यय आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एसएसपी मनु महाराज यांनी सांगितले. चप्पल भिरकावणारा तरुण नितीश सरकारद्वारा सकाळी ९ वाजता हवन बंद करण्याच्या निर्णयावर नाराज होता. दरम्यान, चप्पल फेकण्यापूर्वी आरोपीने मुख्यमंत्र्यांना तुम्ही हिंदु आहात ना मग होमहवनावर बंदी का घातली असा सवाल केला होता?
यापुर्वी, २ वेळा नितीशकुमार यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली आहे. बिहार विधान परिषदेच्या निवडणुक प्रचारात एका व्यक्तीनं नितीश कुमार यांच्य़ावर चप्प्ल फेकली होती, तो व्यक्ती पळ काढण्यात यशस्वी झाला होता, तर २८ जानेवारी रोजी स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधीत असलेल्या ख्तियारपूर येथील एका कार्यक्रमात चप्पल फेकून मारण्यात आली. व्यासपीठापर्यंत चप्पल न पोहचल्यानं नितीश कुमार त्यापासून बचावले. चप्पल फेकणा-या त्या व्यक्तीला पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.