नितीश कुमार पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले, पंतप्रधान मोदी तत्काळ खुर्चीवरून उठले अन्...; सभेचा VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:25 PM2024-11-13T16:25:09+5:302024-11-13T16:26:16+5:30
...यानंतर मोदी आणि नितीश यांनी हस्तांदोलन करून एकमेकांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दरभंगा येथे आयोजित एका सरकारी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी येथील शोभन येथे बिहारच्या दुसऱ्या एम्सची पायाभरणीही केली. या समारंभादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकले. नितीश पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकताना पाहून पंतप्रधान तात्काळ त्यांच्या खुर्चीवरून उभे राहिले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना तसे करण्यापासून रोखले. यानंतर मोदी आणि नितीश यांनी हस्तांदोलन करून एकमेकांचे स्वागत केले.
यानंतर सीएम नितीश पंतप्रधानांच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. याचा व्हडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरेतर, नितीश यांनी यापूर्वीही दोन वेळा मोदींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी रस्ते आणि रेल्वेशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही केले.
दरभंगा; सीएम नीतीश कुमार ने फिर छुए पीएम मोदी के पैर#DarbhangaAIIMS#AksharaSinghpic.twitter.com/L5zThBCgxn
— Amit Prakash (अमित प्रकाश) (@amit_9798) November 13, 2024
मुख्यमंत्री नितीश कुमार व्यासपीठावर पोहोचताच पीएम मोदींसमोर पोहोचले आणि त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकले. मात्र, पंतप्रधान मोदी तत्काळ त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले आणि स्वत: उठून नितीश कुणार यांना अभिवादन केले.
पंतप्रधान मोदी आणि नितीश यांचे एकमेकांवर स्तुती सुमने -
दरभंगा येथील सभेत पीएम नरेंद्र मोदी आणि सीएम नितीश कुमार यांनी एकमेकांचे भरभरून कौतुक केले. दरभंगा येथे एम्सच्या पायाभरणीबद्दल नितीश यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्यांनी बैठकीत उपस्थित लोकांना उभे राहून पंतप्रधानांना अभिवादन करण्यास सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांनीही आपल्या भाषणात नितीश यांच्या सुशासन आणि धोरणांचे कौतुक केले. केंद्रात मोदी आणि बिहारमध्ये नितीश यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार चांगले काम करत असल्याचेही ते म्हणाले.