नितीशकुमार यांचा शपथविधी २० नोव्हेंबरला?

By admin | Published: November 10, 2015 10:54 PM2015-11-10T22:54:57+5:302015-11-10T22:54:57+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला भरघोस यश मिळवून देणारे जनता दल (युनायटेड)चे नेते नितीशकुमार येत्या २० नोव्हेंबरला राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

Nitish Kumar swears on November 20? | नितीशकुमार यांचा शपथविधी २० नोव्हेंबरला?

नितीशकुमार यांचा शपथविधी २० नोव्हेंबरला?

Next

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला भरघोस यश मिळवून देणारे जनता दल (युनायटेड)चे नेते नितीशकुमार येत्या २० नोव्हेंबरला राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
८ नोव्हेंबरला निकाल लागले असले तरी छटपूजा उत्सवानंतरच म्हणजे २० नोव्हेंबरला नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सध्या लोक दिवाळी साजरी करीत आहेत. दिवाळीनंतर सहाव्या दिवशी छटपूजा पर्व येते. छटपूजा हा सर्वांत प्रमुख सण असतो. हे पर्व १८ नोव्हेंबरला संपणार आहे. यानंतरच नितीश कुमारांचा शपथविधी सोहळा होईल. शपथविधी सोहळ्यासाठी २० नोव्हेंबरची तारीख ठरल्याची प्राथमिक माहिती आहे. अर्थात याबाबतचा अधिकृत निर्णय नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या बैठकीनंतरच ठरणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Nitish Kumar swears on November 20?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.