नितीशकुमार पद सोडणार, तेजस्वी लवकरच मुख्यमंत्रिपदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 08:46 AM2023-01-07T08:46:01+5:302023-01-07T08:46:47+5:30

- एस.पी. सिन्हा पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव लवकरच सत्तेची सूत्रे हाती घेणार असल्याचे संकेत राजद प्रदेशाध्यक्ष जगदानंद ...

Nitish Kumar to step down, Tejashwi as Chief Minister | नितीशकुमार पद सोडणार, तेजस्वी लवकरच मुख्यमंत्रिपदी?

नितीशकुमार पद सोडणार, तेजस्वी लवकरच मुख्यमंत्रिपदी?

googlenewsNext

- एस.पी. सिन्हा

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव लवकरच सत्तेची सूत्रे हाती घेणार असल्याचे संकेत राजद प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी शुक्रवारी दिले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राजद प्रमुख लालूंचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि ते लवकरच देशाचे नेतृत्व करणार, ते मुख्यमंत्रिपद सोडून विरोधकांची एकजूट करण्यासाठी देश यात्रा काढतील, असेही ते म्हणाले. 

नितीशकुमार मुख्यमंत्रीपद सोडून देशव्यापी यात्रा काढणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशा स्थितीत तेजस्वी यादव यांच्याकडे बिहारचे नेतृत्व येऊ शकते. जगदानंद सिंह म्हणाले की, एच.डी. देवेगौडा यांनी १९९६ साली ज्या प्रकारे लालू यादव यांच्या मदतीने पंतप्रधान झाले होते, त्याचप्रमाणे लालूंनी नितीशकुमार यांना आशीर्वाद दिला आहे.  

लालू यांनी नितीश यांना लस टोचल्यानंतर ते लवकरच देशाच्या दौऱ्यावर जातील. लालूंनी लावलेली लस दिसत नाही, पण आज नाही, तर उद्या कुणाला तरी जावे लागेल, म्हणून नितीशकुमार जातील. 

Web Title: Nitish Kumar to step down, Tejashwi as Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.