नितीशकुमार पाठविणार मोदींना ‘डीएनए’ नमुने
By admin | Published: August 11, 2015 02:50 AM2015-08-11T02:50:59+5:302015-08-11T02:50:59+5:30
बिहारींच्या डीएनएबद्दल केलेले अवमानजनक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घ्यावे, यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी मोदींविरोधात ‘शब्द वापसी’ मोहीम राबविण्याचा
पाटणा : बिहारींच्या डीएनएबद्दल केलेले अवमानजनक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घ्यावे, यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी मोदींविरोधात ‘शब्द वापसी’ मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला. या मोहिमेअंतर्गत ५० लाख बिहारी आपले डीएनए नमुने पंतप्रधानांकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिहारमधील लोकांच्या डीएनएबाबत केलेले अवमानजनक वक्तव्य मागे घ्यावे, अशी विनंती आम्ही वारंवार केली. मात्र मोदींनी आपले वक्तव्य मागे घेतले नाही.
जनता सार्वभौम आहे. त्यामुळे आता या मुद्यावर जनतेच्या न्यायालयात निवाडा होईल. मोदींनी स्वत:चे वक्तव्य मागे घ्यावे म्हणून बिहारच्या जनतेने याविरोधात ‘शब्द वापसी’ मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे ५० लाख बिहारी या हस्ताक्षर मोहिमेत सहभागी होऊन आपले डीएनए नमुने पंतप्रधानांकडे तपासणीसाठी पाठवतील, असे टष्ट्वीट नितीश यांनी केले.
येत्या २९ तारखेला पाटण्याच्या गांधी मैदानात ‘स्वाभिमान रॅली’सोबतच या ‘शब्द वापसी’ मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल. सप्टेंबर महिन्यात मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ‘शब्द वापसी’साठीची हस्ताक्षर मोहीम आणि डीएनए नमुने पाठविण्यात येतील, असेही नितीश यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)