शरद यादवना केले नेतेपदावरून दूर, नितीशकुमारांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 04:23 AM2017-08-13T04:23:08+5:302017-08-13T04:23:58+5:30
जेडीयूच्या राज्यसभेतील गटनेतेपदावरून शरद यादव यांना काढून त्यांच्या जागी आर. सी. पी. सिंग यांची निवड केली आहे. यादव यांना दूर करून, पक्षाने सत्ताधारी रालोआसोबत जाण्याचे जणू नक्की केले आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : जेडीयूच्या राज्यसभेतील गटनेतेपदावरून शरद यादव यांना काढून त्यांच्या जागी आर. सी. पी. सिंग यांची निवड केली आहे. यादव यांना दूर करून, पक्षाने सत्ताधारी रालोआसोबत जाण्याचे जणू नक्की केले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नितीशकुमार यांना तसे आवाहनच केले होते.
अन्सारी यांची हकालपट्टी
जेडीयूच्या राष्टÑीय कार्यकारिणीच्या १९ आॅगस्टच्या बैठकीत तसा निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर, तो पक्ष केंद्रातही सहभागी होऊ शकेल. शरद यादव हे सध्या बिहारच्या दौºयावर असून, खरा पक्ष आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नितीशकुमार यांच्याकडे फक्त ‘सरकारी जेडीयू’ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांच्या शुक्रवारच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे खासदार अली अन्वर अन्सारी यांचीही पक्षाने हकालपट्टी केली आहे.