नितीश कुमार यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याने तेजस्वी यादवच्या नावावर पडदा

By Admin | Published: July 15, 2017 01:36 PM2017-07-15T13:36:57+5:302017-07-15T13:38:16+5:30

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत होणा-या कार्यक्रमाला तेजस्वी यादव यांनी दांडी मारली

Nitish Kumar's program will be screened in the name of Tashavi Yadav | नितीश कुमार यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याने तेजस्वी यादवच्या नावावर पडदा

नितीश कुमार यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याने तेजस्वी यादवच्या नावावर पडदा

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 15 - बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) या सत्ताधारी महाआघाडीतील पक्षांमध्ये निर्माण झालेले मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत होणा-या कार्यक्रमाला तेजस्वी यादव यांनी दांडी मारली. विशेष म्हणजे मंचावर तेजस्वी यादव यांच्यासाठी खुर्ची आणि नेम प्लेट ठेवण्यात आली होती. मात्र तेजस्वी यादव येणार नसल्याचं कळतात नेम प्लेट कपडा टाकून झाकण्यात आली. यानंतर नेम प्लेटच हटवण्यात आली. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलं असताना मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर उपस्थित राहण्याला नितीश कुमार आणि जदयूचा असलेला आक्षेप लक्षात घेत तेजस्वी यांनी अनुपस्थित राहणं पसंद केलं. 
 
जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सत्तेत असणा-या दोन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र शेवटच्या क्षणी तेजस्वी यांनी न जाण्याचा निर्णय घेतला. राजकीय तज्ञांच्या मते, जदयू मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या क्लिन इमेजमुळे चिंतेत आहे, त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात अंतर राहावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच जदयूने वारंवार तेजस्वी यादव यांच्याकडून स्पष्टीकरण आणि राजीनामा देण्याची मागणी वारंवार केली आहे. मात्र तेजस्वी यादव अद्याप तरी राजीनामा देण्याच्या मूडमध्ये असल्याचं दिसत नाही. 
 
नितीश कुमार यांनी स्वत: कारवाई करत तेजस्वी यादव यांची पक्षातून हाकलपट्टी करावी यासाठी आरजेडी प्रयत्न करत आहे. जेणेकरुन मतदारांची सहानुभूती आपल्याला मिळेल. तसंच महाआघाडी तोडण्याचा आरोपही आपल्यावर न होता जदयूच्या नावे होईल. 
 
आणखी वाचा
शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून तेजस्वी यादवची पाठराखण
८० आमदारांचा धाक दाखवू नका, तेजस्वी प्रकरणी स्पष्टीकरण द्या - जेडीयू
"पहा, लालूंचा मुलगा कसा गुंडागर्दी वाढवत आहे", तेजस्वी यांचे ट्विट
 
सध्या दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आरजेडीने आपल्या ८० आमदारांचा धाक दाखवण्याऐवजी तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा टोला जेडीयूने लगावला होता.  राष्ट्रीय जनता दलाचे बिहार अध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी आपल्या पक्षाकडे ८० आमदारांचे बळ असल्याचे वक्तव्य केले होते. 
 
जेडीयूचे बिहारमधील मुख्य प्रवक्ते संजय सिंह म्हणाले होते की, आरजेडीने आपल्या ८० आमदारांचा गर्व बाळगू नये. त्यांनी २०१०मधील आपली २२ आमदारांची संख्या लक्षात ठेवली पाहिजे. २०१५ साली आरजेडीच्या वाढलेल्या आमदारांच्या संख्येमध्ये नितीश कुमार यांच्या विश्वासार्ह चेहऱ्याचा मोठा हात होता हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधाल रेल्वेच्या हॉटेल घोटाळ्या प्रकरणी आरोप झाले असून, त्यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. 
 
सध्या २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे ८०, संयुक्त जनता दलाचे ७१, काँग्रेसचे २७ आणि भाजपाचे ५३ आमदार आहेत.  
 

Web Title: Nitish Kumar's program will be screened in the name of Tashavi Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.