शेतकरी आंदोलनांवरून नितीश कुमार यांचे मोदींवर टीकास्त्र

By admin | Published: June 12, 2017 03:50 PM2017-06-12T15:50:48+5:302017-06-12T15:59:36+5:30

राजकीय वर्तुळामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात जवळीक होत असल्याची चर्चा असतानाच आज नितीश कुमार यांनी

Nitish Kumar's remarks on farmers' agitation | शेतकरी आंदोलनांवरून नितीश कुमार यांचे मोदींवर टीकास्त्र

शेतकरी आंदोलनांवरून नितीश कुमार यांचे मोदींवर टीकास्त्र

Next
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 12 - राजकीय वर्तुळामध्ये  बिहारचे मुख्यमंत्री  नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात जवळीक होत असल्याची चर्चा असतानाच आज नितीश कुमार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण बनवण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारवर नितीश कुमार यांनी टीकास्र सोडले आहे. तसेच हिंमत असेल तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तात्काळ निवडणुका घेण्याचे आव्हानही त्यांनी दिले. 
 आज बऱ्याच दिवसांनंतर नितीश कुमार यांनी मोदींना थेट लक्ष्य केले. ते म्हणाले, "2014 साली झालेल्या निवडणुकीच्या आधी भाजपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोठमोठी आश्वासने दिली  होती. तेव्हा मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते आणि ते आश्वासने देत सुटले होते. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा या आश्वासनांचा समावेश करण्यात आला होता." 
 शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय धोरण ठरवण्यात अपयशी ठरल्याने नितीश यांनी मोदींवर टीका केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मूल्य सर्वप्रथम निश्चित झाले पाहिजे. मंदासोरला झालेला गोळीबार किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनासारखी घटना झाल्यावर कर्जमाफीची घोषणा करणे हा वरवरचा उपाय आहे. त्यातून शेतकऱी आणि शेतीवरील संकट दूर होणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले. 
 यावेळी महात्मा गांधी यांच्याबाबत अनुद्गार काढणारे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर नितीश कुमार यांनी टीका केली. तसेच शेतीची समस्या सोडवण्यासाठी योगा करण्याचा सल्ला देणारे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचीही त्यांनी खिल्ली उडवली.  गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये निवडणुका घेण्याच्या पुड्या सोडणाऱ्यांनाही त्यांनी रोखठोक इशारा दिला. मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आताचा बिहार आणि उत्तर प्रदेशात निवडणुका घ्याव्यात असे आव्हान त्यांनी दिले.  

Web Title: Nitish Kumar's remarks on farmers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.