नितिशकुमारांची 24 तासांत पलटी; झारखंडमध्ये भाजपा मुख्यमंत्र्याविरोधात प्रचार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 04:33 PM2019-11-21T16:33:28+5:302019-11-21T16:34:07+5:30

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. तर काँग्रेसचे नेते प्रचाराला येण्याचे नाव घेत नाहीयत.

Nitish Kumar's u turn in 24 hours; In Jharkhand, should not campaign against the chief minister of Bjp | नितिशकुमारांची 24 तासांत पलटी; झारखंडमध्ये भाजपा मुख्यमंत्र्याविरोधात प्रचार नाही

नितिशकुमारांची 24 तासांत पलटी; झारखंडमध्ये भाजपा मुख्यमंत्र्याविरोधात प्रचार नाही

Next

रांची :  लोकसभा निवडणुकीनंतर दुय्यम केंद्रीय मंत्रिपदावरून नाराज असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी झारखंडमध्ये भाजपाच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधातच दंड थोपटणाऱ्या भाजपाच्या बंडखोर मंत्र्याला थेट पाठिंबाच जाहीर करून टाकला होता. मात्र, बिहारमध्ये सत्ता राखण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे. 


महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. झारखंडमधील भाजप आणि मित्रपक्षांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ते एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करीत आहेत. नितीशकुमार यांचा जेडीयु स्वबळावर ही निवडणूक लढत आहे. आतापर्यंत त्यांनी २५ उमेदवार जाहीर केले आहेत. तर एनडीएचा घटक पक्ष असलेली लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) स्वबळावर झारखंड विधानसभा निवडणूक लढणार आहे. असे असताना भाजपाचे मंत्री सरयू राय यांनी मुख्यमंत्र्यांविरोधातच बंडखोरी करत आव्हान उभे केले आहे. 


राय हे मुख्यमंत्र्याविरोधातच अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत. त्यांनी नितिशकुमार यांच्याशी सख्य असल्याने तिकिट नाकारल्याचा आरोप केला आहे. राय यांनी अर्ज भरताच नितिशकुमार यांनी त्यांच्या उमेदवारांना माघारी बोलावले होते. तसेच त्यांच्यासाठी प्रचार करण्याचे आदेश कार्य कर्त्यांना दिले होते. या घडामोडी होऊन रात्र उलटत नाही तोच नितिशकुमार यांनी पलटी मारली आहे. 


पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर नितिशकुमार यांनी झारखंडमध्ये माझ्या प्रचाराची गरज नसल्याचे म्हटले आहे. भाजपविरोधात प्रचार केल्यास त्याची झळ बिहारमधील भाजपाच्या पाठिंब्यावर असलेल्या सरकारला बसू शकते, अशी भीती त्यांना सतावू लागली आहे. यामुळे नितिशकुमार यांनी सावध भूमिका घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

Web Title: Nitish Kumar's u turn in 24 hours; In Jharkhand, should not campaign against the chief minister of Bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.