नितीश पायाला स्पर्श करू लागले, मोदींनी रोखलं, तरी...! चिराग यांचीही गळाभेट...; NDAच्या बैठकीत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 02:19 PM2024-06-07T14:19:06+5:302024-06-07T14:20:54+5:30
‘आपण रविवारी शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन केले आहे. आपण आजच पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी, असे आम्हाला वाटते,’ असेही नितीश कुमार म्हणाले...
लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर, शुक्रवारी देशाच्या जुन्या संसदेत एनडीएची बैठक पार पडली. यावेळी, भाजपच्या सर्व घटक पक्षांनी संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाला मंजुरी दिली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही नरेंद्र मोदी यांच्या नावाला सहमती दर्शवली. भाषण संपल्यानंतर नितीश जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटले तेव्हा त्यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी त्यांना रोखले. यानंतर थोड्याच वेळात आपले भाषण संपल्यानंतर चिराग पासवान नरेंद्र मोदींजवळ आले, तेव्हा मोदींनी चिरागला गळ्याला लावले.
नितीश कुमार आपल्या भाषणात म्हणाले, ’हे (नरेंद्र मोदी) गेल्या 10 वर्षांपासून पंतप्रधान आहेत आणि आता पुन्हा पंतप्रधान होत आहेत. पूर्ण विश्वास आहे की, जे काही राहिले आहे. हे सर्व पूर्ण करतील. प्रत्येक राज्याचे जे काही आहे, सर्व पूर्ण करतील. या लोकांनी निरर्थक बोलून आजपर्यंत कोणते काम केले आहे का? बिहारची सर्व कामे होतील. जी रीहिली आहेत आणि जे आपल्याला वाटते ते होईल.’ याशिवाय, ‘आपण रविवारी शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन केले आहे. आपण आजच पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी, असे आम्हाला वाटते,’ असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
चिराग पासवान म्हणाले, "मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. आपल्यामुळेच एनडीएला एवढा मोठा विजय मिळाला आहे. याचे संपूर्ण श्रेय आपल्याला जाते. ही एक अशी इच्छाशक्ती होती, जिने इतिहासातील एवढा मोठा विजय मिळविण्यास मदत केली. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एनडीएला सलग तिसऱ्यांदा एवढा मोठा विजय मिळाला, ही काही सामान्य गोष्ट नव्हती. आपल्यामुळेच आज आम्ही संपूर्ण जगाला अभिमानाने सांगू शकतो की, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारतीय जनतेचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.