रालोआला धक्का

By admin | Published: August 29, 2014 04:15 AM2014-08-29T04:15:34+5:302014-08-29T04:15:34+5:30

हरियाणात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना कुलदीप बिश्नोई यांच्या हरियाणा जनहित काँग्रेसने (एचजेसी-बीएल) रालोआतून बाहेर पडत भाजपाला पहिला हादरा दिला आहे

NLO Push | रालोआला धक्का

रालोआला धक्का

Next

चंदीगड : हरियाणात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना कुलदीप बिश्नोई यांच्या हरियाणा जनहित काँग्रेसने (एचजेसी-बीएल) रालोआतून बाहेर पडत भाजपाला पहिला हादरा दिला आहे. मोदी लाटेची देशात हवा असतानाच बिश्नोई यांनी भाजपासोबतची तीन वर्षांपासूनची युती संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली.
भाजपाने आमच्या पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोपही बिश्नोई यांनी केला. काँग्रेसचे माजी नेते विनोद शर्मा यांच्या जनचेतना पक्षासोबत(जेसीपी) युती करून आॅक्टोबरमधील निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही भाजपाशी युती कायम ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, पण भाजपाने युतीधर्म पाळलेला नाही, असे ते येथे पत्रपरिषदेत म्हणाले. बिश्नोई हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र आहेत.
विश्वासघात हा भाजपाचा स्वभावच
बिश्नोई यांनी विश्वासघात हा भाजपाचा स्वभावच असल्याचा पुनरुच्चार केला. बुधवारी भिवानी जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर आगपाखड केली होती. गेल्या तीन वर्षांपासून मी भाजपाला मनापासून सहकार्य करीत होतो; मात्र या पक्षाने अखेर माझा विश्वासघात केला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एचजेसीला लढविलेल्या दोनपैकी एकही जागा जिंकता आली नव्हती तर भाजपाने सात जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षांमधील तणाव अधिकच वाढला होता. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून दोन पक्षांचे संबंध विकोपाला गेले होते.

Web Title: NLO Push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.