आरोग्य मंत्रालयाने NMC च्या आदेशाला दिली स्थगिती; लवकरच नव्या नियमांमध्ये होणार सुधारणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 04:29 PM2023-08-25T16:29:55+5:302023-08-25T16:45:40+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : नॅशनल मेडिकल कमिशनकडून (NMC) नुकतेच काही नवीन नियम लागू करण्यात आले होते. हे नियम अधिसूचित केल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि आयपीएने (IPA) याला विरोध दर्शविला होता. यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आयपीएच्या विरोधामुळे डॉ. मनसुख मांडविया यांनी डॉक्टरांसाठी जारी केलेले हे नियम पुढील अधिसूचना जारी होईपर्यंत स्थगित केले आहेत. तसेच या प्रकरणाची नॅशनल मेडिकल कमिशनकडून दखल घेतली जाईल, असे आश्वासन डॉ. मनसुख मांडविया यांनी दिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मनसुख मांडविया यांनी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत इंडियन मेडिकल असोसिएशनने या अधिसूचनेला कडाडून विरोध केला. आयएमए आणि आयपीएने विरोध करत नॅशनल मेडिकल कमिशनच्या या नियमांना चुकीचे म्हटले. या विरोधानंतर नॅशनल मेडिकल कमिशनच्या नव्या नियमावलीवर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नॅशनल मेडिकल कमिशनने डॉक्टरांसाठी नवे नियम जारी केले होते,
नॅशनल मेडिकल कमिशनने डॉक्टरांसाठी जारी केलेल्या नियमांमध्ये रुग्णांना फक्त जेनेरिक औषधे लिहून दिली जातील, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. याचबरोबर, कॉन्फरन्सला न जाणे आदी बंधनांनी भरलेल्या आचारसंहितेवरही बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता आरोग्य मंत्रालयाने पुढील निर्णय किंवा अधिसूचना जारी होईपर्यंत या आदेशांना स्थगिती दिली आहे.
जेनेरिक औषधे लिहून द्या, नाही तर जबर दंड; कमिशनकडून आधीचे डॉक्टरांसाठी नियम