रिलायन्स जिओ नेटवर्कमध्येही नंबर 1

By admin | Published: February 2, 2017 09:36 PM2017-02-02T21:36:51+5:302017-02-02T21:36:51+5:30

सर्वेक्षणात रिलायन्स जिओचं नेटवर्क अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूपच जलद असल्याचं समोर आलं आहे.

No. 1 in Reliance Jio network | रिलायन्स जिओ नेटवर्कमध्येही नंबर 1

रिलायन्स जिओ नेटवर्कमध्येही नंबर 1

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड रिसर्च फर्म क्रेडिट स्विस एक्विटी रिसर्च यांनी वेगवेगळ्या शहरांत डेटा नेटवर्क(मोबाईल इंटरनेट)साठी केलेल्या सर्वेक्षणात रिलायन्स जिओचं नेटवर्क अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूपच जलद असल्याचं समोर आलं आहे.

या संस्थेनं 30 शहरांत केलेल्या अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढला आहे. सर्वेक्षणानुसार 80 टक्के शहरांत रिलायन्स जिओ नेटवर्कचे कव्हरेज चांगलं आहे. तर इतर कंपन्यांचं नेटवर्क कव्हरेज फक्त 30 टक्के शहरांत चांगल्या श्रेणीत दाखवण्यात आलं आहे. या संस्थेनं राज्यांच्या राजधानींसह इतरही शहरांत नेटवर्क कव्हरेज आणि स्पीडचं मूल्यमापन केलं आहे. त्यामुळे 4जी नेटवर्कमध्ये जिओ सर्वात प्रगल्भ आणि पुढे असून, इतरही कंपन्यांना त्याच्या श्रेणीत येण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

तसेच 4जी नेटवर्कच्या स्पीडमध्ये एअरटेल सर्वाधिक म्हणजे 12 एमबीपीएस स्पीडने पुढे आहे. त्याच्या तुलनेत व्होडाफोन, आयडिया आणि रिलायन्स जिओचा स्पीड 7 ते 8 एमबीपीएसच्या दरम्यान आहे. मात्र सध्याच्या घडीला देशात 90 टक्क्यांहून अधिक लोक जिओ नेटवर्क वापरत असल्यानं जिओचा स्पीड सर्वाधिक नोंदवण्यात आला आहे.

Web Title: No. 1 in Reliance Jio network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.