काळा पैशावर मोदींसारखी कारवाई कोणीच केली नाही- जेटली
By admin | Published: January 8, 2017 04:41 PM2017-01-08T16:41:21+5:302017-01-08T16:53:31+5:30
मोदी सरकारनं हे सर्व करून दाखवलं आहे, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारनं देशाच्या सुरक्षेसाठी नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नव्हती, मात्र मोदी सरकारनं हे सर्व करून दाखवलं आहे, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. पंजाबमधल्या अमृतसर येथील विजय संकल्प यात्रा रॅलीमध्ये ते बोलत होते.
केंद्र सरकार समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करत आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. काँग्रेसनं पंजाबमध्ये 2002-07दरम्यान स्वतःचे सरकार असताना राज्यासाठी कोणतंही काम केलं नाही. काँग्रेसवाले फक्त आरोप-प्रत्यारोप आणि बदल्यांचं राजकारण करत आले आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार असताना शिक्षणासह कोणत्याही क्षेत्रात काँग्रेसनं चांगली कामगिरी केली नाही. मात्र अकाली दल-भाजपा सरकारनं गेल्या 10 वर्षांत राज्याचा अभूतपूर्व असा विकास केला आहे. राज्यात हल्लीच केंद्रीय शैक्षणिक संघटनांनी शिक्षणासाठी चांगला प्रचार केला आहे. अकाली दल आणि भाजपा आता तिस-यांदा पंजाबमध्ये सत्तेवर येईल, असंही जेटली म्हणाले आहेत.
(नोटा बंदीमुळे ८६ टक्के चलन बदलणार - अरुण जेटली)
(500 रुपयांच्या जास्त नोटा वितरणात येणार - अरुण जेटली)
दरम्यान, जेटलींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींच्या कार्यकाळात देश प्रामाणिक, स्वच्छ आणि प्रगतिपथावर असल्याचं म्हटलं आहे. पंजाबमध्ये भाजपाची ही यात्रा 29 डिसेंबर 2016पासून प्रदेशाध्यक्ष विजय सांपला यांच्या नेतृत्वात सुरू झाली असून, पंजाब निवडणुकीत विजय मिळवण्याच्या उद्देशानं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाला बहुमत असलेल्या 23 ठिकाणांहून ही यात्रा काढण्यात आली आहे.
From 2002-2007 did Congress do a single thing for Punjab? They only indulged in vendetta politics and blame-game: Arun Jaitley in Amritsar pic.twitter.com/rpGnq2GtzN
— ANI (@ANI_news) 8 January 2017
No govt had the guts to cross LoC for country's security or make such a huge attack on black money & corruption: Arun Jaitley in Amritsar pic.twitter.com/m36emBwvbs
— ANI (@ANI_news) 8 January 2017