नाही म्हणजे नाही, एअर इंडियाने पुन्हा गायकवाडांचे तिकिट केले रद्द

By Admin | Published: March 28, 2017 04:25 PM2017-03-28T16:25:23+5:302017-03-28T16:26:01+5:30

एअर इंडियाने पुन्हा एकदा उस्मानाबादचे शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचे मुंबई-दिल्ली विमान प्रवासाचे तिकीट रद्द केले आहे.

No, Air India has canceled the Gaikwad ticket again | नाही म्हणजे नाही, एअर इंडियाने पुन्हा गायकवाडांचे तिकिट केले रद्द

नाही म्हणजे नाही, एअर इंडियाने पुन्हा गायकवाडांचे तिकिट केले रद्द

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 28 - एअर इंडियाने पुन्हा एकदा उस्मानाबादचे शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचे मुंबई-दिल्ली विमान प्रवासाचे तिकीट रद्द केले आहे. बुधवार सकाळची गायकवाड यांची मुंबई ते दिल्ली प्रवासाची तिकीट एअर इंडियाने रद्द केली.  मागच्या आठवडयात रविंद्र गायकवाडांनी एअर इंडियाचे मॅनेजर आर. सुकूमार यांना चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियासह अन्य भारतीय विमान कंपन्यांनी त्यांचा नो फ्लाय लिस्टमध्ये समावेश केला आहे. 
 
त्यामुळे रविंद्र गायकवाडांच्या देशातंर्गत विमान प्रवासावर बंदी आली आहे. रविंद्र गायकवाडांनी आपल्या वर्तनाबद्दल माफी मागायला नकार दिला. मी का माफी मागू ? असा उलटा प्रश्न त्यांनी केला. बिझनेस क्लास ऐवजी इकोनॉमी क्लासमध्ये बसवल्याच्या रागातून रविंद्र गायकवाडांनी सुकूमार यांना मारहाण केली होती. 
 
संसदेतही शिवसेनेने रविंद्र गायकवाड यांची बाजू लावून धरली आहे. विमानात गोंधळ घालणा-या कपिल शर्मावर कारवाई होत नाही मग रविंद्र गायकवाडांवर कारवाई का ? असा शिवसेनेचा प्रश्न आहे. दरम्यान सरकारने रविंद्र गायकवाड यांचे वर्तन चुकीचे असल्याचे म्हटले आहे. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. खासदार असे वर्तन करेल अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. कुठल्याही प्रकारचा हिंसाचार विमानासाठी आपत्ती असते असे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू म्हणाले होते. 
 
अजूनही रविंद्र गायकवाडांना आपल्या वर्तनाबद्दल अजिबात खेद नाहीय. आज सकाळी महाराष्ट्र सदनमध्ये बोलताना त्यांनी कसला पश्चाताप, मी माफी मागणार नाही, सुकुमार यांनी येऊन माफी मागावी असे गायकवाड म्हणाले.  

Web Title: No, Air India has canceled the Gaikwad ticket again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.