पाक कलाकारांचा एकही सिनेमा दाखवणार नाही, सिनेमा ओनर्स असोसिएशनचा निर्णय

By admin | Published: October 14, 2016 03:16 PM2016-10-14T15:16:21+5:302016-10-14T16:30:58+5:30

'पाकिस्तानी कलाकार असलेले एकही सिनेमे दाखवणार नाही, अशी भूमिका सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशनने घेतली आहे.

No cinema will be displayed by the artist, the decision of the Cinema Owners Association | पाक कलाकारांचा एकही सिनेमा दाखवणार नाही, सिनेमा ओनर्स असोसिएशनचा निर्णय

पाक कलाकारांचा एकही सिनेमा दाखवणार नाही, सिनेमा ओनर्स असोसिएशनचा निर्णय

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' या सिनेमांच्या प्रदर्शनातील मार्गात अडचण निर्माण झाली आहे.  पाकिस्तानी कलाकार असलेले एकही सिनेमे दाखवणार नाही, अशी भूमिका सिनेमा ओनर्स असोसिएशनने घेतली आहे. सिनेमा ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 'पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा न दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या पार्श्वभूमीवर करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रदर्शित न करण्यासंदर्भातील सूचनाही एक्झिबिटर्स असोसिएशनने सर्व सदस्यांना दिली आहे', अशी माहिती सिनेमा ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दातार यांनी दिली आहे. मुंबईसह महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आहे. तर इतर राज्यांना या निर्णयाची माहिती देण्यात येणार आहे.
 
'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने हा सिनेमा अडचणीत आला आहे. उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून होणा-या दहशतवादी कारवाया थांबत नसल्याने भारताने पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून 'इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युर्स असोसिएशन'ने (इम्पा) भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या काम करण्यावर बंदी घातली. 
 
आणखी बातम्या
 
इम्पाने घेतलेल्या निर्णयाच्या एक पाऊल पुढे जात, सिनेमा ओनर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेले सिनेमे न दाखवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सिनेमा ओनर्स असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयामुळे फक्त 'ए दिल है मुश्किल'च नाही तर शाहरुख खान आणि पाकिस्तानी कलाकार माहिरा खानचा 'रईस' आणि अली जफरचा 'डीअर जिंदगी' सिनेमाही अडचणीत आले आहेत. दरम्यान, मनसे आणि शिवसेनेनंही आपल्या भूमिकेवर कायम रहात,  सिनेमा ओनर्स असोसिएशनने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करत त्यांचे अभिनंदन केले आहे.


Web Title: No cinema will be displayed by the artist, the decision of the Cinema Owners Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.