‘पास-पास वाली नहीं साथ-साथ वाली सरकार’
By admin | Published: October 9, 2014 03:13 AM2014-10-09T03:13:04+5:302014-10-09T03:13:04+5:30
एक नवा सिद्धांत मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हरियाणातील मतदारांना भाजपाला बहुमताने निवडून देण्याची विनंती केली़ ‘मुझे पास-पास वाली सरकार नहीं
जगधारी(हरियाणा) : एक नवा सिद्धांत मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हरियाणातील मतदारांना भाजपाला बहुमताने निवडून देण्याची विनंती केली़ ‘मुझे पास-पास वाली सरकार नहीं, साथ-साथ वाली सरकार चाहिए’़ केंद्र आणि राज्यांत एकाच पक्षाचे सरकार असेल तर राज्याच्या विकासासंदर्भातील परिणाम निश्चितपणे वेगळे असतील, असे ते म्हणाले़
हरियाणात येत्या १५ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुका होत आहेत़ या पार्श्वभूमीवर मोदींनी आज अनेक प्रचार सभांना संबोधित केले़ मी टीम इंडियाच्या कल्पनेनुरूप काम करीत आहे़ आम्ही राज्यांचे शत्रू नाही, उलट राज्यांना अधिक सक्षम बनविण्याची आमची इच्छा आहे़ जेणेकरून संपूर्ण देश सक्षम होईल़ केंद्र व राज्यांच्या संबंधांवर जोर देत ते म्हणाले की, आत्तापर्यंत एक अधिक एक दोन होत होते़ कारण राज्य केंद्रानंतर यायचे़ पण मी हे गणित बदलवू इच्छितो़ एक अधिक एक मिळून मला अकरा, असे गणित मी मांडू इच्छितो़ हे भारताला अकरा पटीने अधिक शक्तिशाली बनवेल़ मग देश बदलण्यास वेळ लागणार नाही़ (वृत्तसंस्था)