No Confidence Motion: नाराज शत्रुघ्न सिन्हा देणार मोदी सरकारची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 11:41 AM2018-07-19T11:41:50+5:302018-07-19T11:42:27+5:30
गेल्या काही काळापासून पक्ष आणि केंद्रीय नेतृत्वावर नाराज असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करत असलेले भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून पक्ष आणि केंद्रीय नेतृत्वावर नाराज असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करत असलेले भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान केंद्र सरकारला साथ देऊन प्रस्तावाविरोधात मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
BJP MP Shatrughan Sinha will vote against the #NoConfidenceMotion (file pic) pic.twitter.com/SFoPa7cmQ2
— ANI (@ANI) July 19, 2018
भाजपाचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा हे अविश्वास प्रस्तावाविरोधात मतदान करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आपण मोदी सरकारचे समर्थन करणार असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी हे माझे नेते आहेत. त्यामुळे मी अविश्वास प्रस्तावाविरोधात मतदान करणार आहे. केंद्र सरकार आणि पक्षाबाबत माझी नाराजी नव्हती. तसेच आरक्षण संपुष्टात येणार नसल्याचेही मोदींनी स्पष्ट केले आहे," असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.