‘शिस्तपालना’साठीही भूषण नकोत!
By admin | Published: March 30, 2015 01:24 AM2015-03-30T01:24:59+5:302015-03-30T01:24:59+5:30
राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची हकालपट्टी केल्यानंतर आम आदमी पार्टीने रविवारी अॅडमिरल एल.
नवी दिल्ली : राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची हकालपट्टी केल्यानंतर आम आदमी पार्टीने रविवारी अॅडमिरल एल. रामदास यांना अंतर्गत लोकपाल पदावरून, तर भूषण यांना राष्ट्रीय शिस्तपालन समितीवरून हटविले.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तातडीने बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अंतर्गत लोकपाल समितीचे पुनर्गठन करीत, यात तीन नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
भूषण यांच्या जागी दिनेश वाघेला हे आता त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील. केजरीवालांचे निकटस्थ आशिष खेतान व राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांचीही नव्या शिस्तपालन समितीवर वर्णी लागली आहे. नव्या लोकपाल समितीत माजी आयपीएस एन. दिलीप कुमार, राकेश सिन्हा, तसेच शिक्षणतज्ज्ञ एस.पी. वर्मा यांचा समावेश असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)