परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 06:28 PM2020-07-09T18:28:14+5:302020-07-09T18:34:19+5:30

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडने या भरतीची घोषणा केली आहे. मात्र, लॉकाडाऊनमुळे अर्ज कधीपासून भरता येणार हे जाहीर केलेले नाही.

No exams, just an interview and a government job in India Seeds Recruitment 2020 | परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

googlenewsNext

India Seeds Recruitment 2020: नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडने अनेक पदांवर भरती आयोजित केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी, सिनिअर ट्रेनी यांच्यासह अन्य पदे अशा 220 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी वयाची अट वेगवेगळी आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. 


पदे आणि संख्या
I. मॅनेजमेंट ट्रेनी- 36

II. सीनियर ट्रेनी- 59

III. डिप्लोमा ट्रेनी- 07

IV. ट्रेनी- 112

V. ट्रेनी मेट- 03

VI. असिस्टंट (लीगल)- 03

एकूण संख्या- 220

शैक्षणिक योग्यता

I. मॅनेजमेंट ट्रेनी: अॅग्रीकल्चर मध्ये बीएससी, एमबीए/ एमएससी/बीई/बीटेक (अॅग्रीकल्चर इंजीनियरिंग)(सिविल)/ सीए/सीएस

II. सीनियर ट्रेनी: एमबीए (अॅग्रीकल्चर बिजनेस मैनेजमेंट)/ बीएससी (अॅग्रीकल्चर) किंवा सिविल/एग्रीकल्चर/इलेक्ट्रिकल इंजीनीयरिंग मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा

III. डिप्लोमा ट्रेनी: एमबीए (अॅग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंट)/बीएससी (अॅग्रीकल्चर) किंवा सिविल/अॅग्रीकल्चर/इलेक्ट्रिकल इंजीनीयरिंग मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा

IV. ट्रेनी: फिटर ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र किंवा बीबीए/ बीसीए/ बीए (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा बीकॉम किंवा अॅग्रीकल्चर/ केमिस्ट्री और बॉटनी मध्ये बीएससी

V. ट्रेनी मेट: अॅग्रीकल्चरमध्ये 12वी पास

VI. असिस्टंट (लीगल): लॉची डिग्री

वयाची अट काय? 
मॅनेजमेंट ट्रेनी, सीनियर ट्रेनी, डिप्लोमा ट्रेनी आणि ट्रेनी या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 27 वर्ष असावे अशी अट आहे. तर ट्रेनी मेट आणि असिस्ंटट (लीगल) च्या पदांसाठी 25 आणि 30 वर्षे असणे आवश्यक आहे. 


महत्वाचे....
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडने या भरतीची घोषणा केली आहे. मात्र, लॉकाडाऊनमुळे अर्ज कधीपासून भरता येणार हे जाहीर केलेले नाही. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर याची घोषणा केली जाईल. यामुळे वेबसाईटवर पाहत राहणे गरजेचे आहे. ओपनसाठी 525 रुपये अर्ज शुल्क असून आरक्षणासाठी 25 रुपये फी आहे. हे ऑनलाईन भरता येणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, गयावया करू लागला

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

Web Title: No exams, just an interview and a government job in India Seeds Recruitment 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.