फास्ट फूडला फाटा; घराघरांत चवदार खमंग पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:55 AM2020-04-10T05:55:46+5:302020-04-10T05:55:52+5:30

कोरोना विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन दिल्ली चाटवरही परिणाम करणारे ठरले आहे.

No to Fast food; Homemade tasty salty foods | फास्ट फूडला फाटा; घराघरांत चवदार खमंग पदार्थ

फास्ट फूडला फाटा; घराघरांत चवदार खमंग पदार्थ

googlenewsNext

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे दिल्ली चाटसह फास्ट फूड जवळपास हद्दपार झाले असून, घराघरांत खमंग पदार्थांची रेलचेल आहे. याचा परिणाम वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या रेसिपी किचनमध्ये तयार होत आहेत. परिणामी, सकस आहार मिळाल्याने प्रतिकारक्षमता वाढण्यास मोठी मदत मिळत आहे.
दाबेली, रगडा पॅटिस, सँडविच, पाणीपुरी, कचोरी, समोसा, पॅटिस, बर्गर, पिझ्झा या आणि असे कितीतरी ‘दिल्ली चाट’ दिल्लीकरांच्या जगण्याचा जणू महत्त्वाचा घटक आहे. दिवसातून एकदा, एक दिवसाआड किंवा आठवड्यातून किमान तीन दिवस ‘चाट’ची चव दिल्लीकर चाखतात. काही जणांच्या बाबतीत तर हे प्रमाण अधिक आहे. चविष्ट आणि चमचमीत असलेले हे फास्ट फूड जिभेचे चोचले पुरविणारे असले तरी ते आरोग्याला मात्र हानिकारक असल्याचे आहारतज्ज्ञ वारंवार सांगतात. तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत फास्ट फूड हे दिल्लीकरांच्या आहारातील महत्त्वाचा घटक बनले आहे. परिणामी, दिल्ली चाट हे संपूर्ण भारतातच ख्यात असून ते आता देशाच्या अन्य भागांतही उपलब्ध होऊ लागले आहे.
मात्र, कोरोना विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन दिल्ली चाटवरही परिणाम करणारे ठरले आहे. घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याने आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद असल्याने फास्ट फूड दिल्लीतून जवळपास हद्दपार झाले आहे. घराघरांत असलेली कुटुंबे मात्र वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ बनवीत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे दिल्ली चाट किंवा फास्ट फूडची जागा पारंपरिक आणि सकस आहाराने घेतली आहे. गहू, बाजरी, नाचणी, ज्वारीच्या पिठापासून तसेच, विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्यापासून बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची घरातील किचनमध्ये रेलचेल आहे.
कोरोना विषाणूच्या संकटात आपली प्रतिकारक्षमता टिकविणे आणि वाढविणे आवश्यक आहे. आणि याच काळात सकस आहाराच्या मेजवानीतून शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळत आहेत. त्यामुळे कोनोराचा मुकाबला करण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत फरिदाबादमधील डॉ. राहुल रावत यांनी व्यक्त केले आहे.

पोहे, उपमा, ढोकळा, इडलीची लॉकडाऊनमध्ये रेलचेल
४सध्या आम्ही घरातच असलो तरी मुगाच्या डाळीची खिचडी, डाळींपासून बनविले जाणारे शेंगोळे, विविध प्रकारचे थालीपीठ, पराठे, पोहे, उपमा, शिरा, खमंग ढोकळे, इडली, डोसे यासह विविध प्रकारच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा घराघरांत घमघमाट आहे. आम्ही घरगुती मॅगी बनवून मुलांना दिली. त्यांना ती आवडली, असे आयपी एक्स्टेंशन येथे राहणाºया शिनकर कुटुंबाने सांगितले आहे.
४सध्या विविध प्रकारच्या डाळींचे पदार्थ आम्ही बनवीत असल्याचे प्रीतविहार येथील लोखंडे परिवाराचे म्हणणे आहे. आईच्या हातचे अनेक पदार्थ बºयाच वर्षांनी पुन्हा खायला मिळत आहे. त्याची चव काही भन्नाटच असल्याचे मत ‘मयूर विहार’ मधील जोशी कुटुंबाने व्यक्त केले आहे.

Web Title: No to Fast food; Homemade tasty salty foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.