'हा' फोटो पाहिला असेलच?; आता त्यामागची 'ही' खरी गोष्ट वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 01:33 PM2019-01-02T13:33:26+5:302019-01-02T13:34:05+5:30
निर्मला सितारमण यांचा एक फोटो फेसबुक, व्हॉट्सअॅपसह अनेक सोशल साईटवरुन व्हायरल होत आहे.
मुंबई - संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये निर्मला सितारमण एका सैन्यातील महिला ऑफिसरसोबत दिसत असून त्या महिला ऑफिसर म्हणजे सितारमण यांच्या कन्या असल्याचं या फोटोसह सांगण्यात येत आहे. मात्र, त्या फोटोतील महिला लष्कर अधिकारी सितारमण यांची कन्या नसून त्यांचं नाव निकिता विरैह असे आहे.
निर्मला सितारमण यांचा एक फोटो फेसबुक, व्हॉट्सअॅपसह अनेक सोशल साईटवरुन व्हायरल होत आहे. या फोटोत सितामरण एका महिला लष्कर अधिकाऱ्यासोबत दिसून येत आहेत. Team Modi Supporter Jalaur या आणि I Support RSS… या फेसबुक पेजवरुन हा फोटो सर्वप्रथम शेअर करण्यात आला. त्यानंतर, व्हॉट्सअॅपवरुनही हा फोटो व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोसोबत भावनिक संदेश देण्यात आला असून सैन्यात अधिकारी असलेल्या आपल्या कन्येसोबत संरक्षणमंत्री निर्मला सितारमण, असे लिहिण्यात आले आहे. मात्र, व्हायरल होणाऱ्या या फोटोचे सत्य वेगळंच आहे.
Tag a lady for the motivation ⚔️🇮🇳❤️ #indianarmyhttps://t.co/YN37Z7eNQBpic.twitter.com/P4stx6oG6f
— SSBCrack (@SSBCrack) November 8, 2018
विशेष म्हणजे 8 नोव्हेंबर रोजीही हा फोटो ट्विटरवरुन शेअर करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी या दोघांच्या नातेसंबंधाबद्दल कुठलाही उल्लेख तिथं लिहिण्यात आला नव्हता. तर, महिलांसाठी प्रेरणादायी असे कॅप्शन त्यावेळी या फोटोसोबत देण्यात आले होते. त्यामुळे, या व्हायरल फोटोबाबत सैन्यातील अधिकारी कर्नल अमन आनंद यांना प्रश्न विचारला असता, संरक्षणमंत्र्यांच्या दौऱ्यातला हा फोटो असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संरक्षणमंत्र्यासोबत असणाऱ्या त्या तरुण महिला अधिकारी सैन्याच्या संपर्कअधिकारी असल्याचा खुलासा आनंद यांनी केला आहे.
दरम्यान, निर्मला सितारमण यांनाही एक कन्या असून तिचे नाव वांगमयी पराकला असे आहे. सितारमण यांनी निवडणुकीचा अर्ज भरताना याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तर, निर्मला सितारमण यांचा एक कौटुंबीक व्हिडीओ असून त्यामध्ये दिसणारी त्यांनी कन्या फोटोतील महिला अधिकाऱ्यापेक्षी वेगळीच दिसून येत आहे.