CoronaVirus News: अमित शहांचा कोरोना अहवाल खरंच निगेटिव्ह?; गृह मंत्रालय म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 03:34 AM2020-08-10T03:34:44+5:302020-08-10T06:51:43+5:30

मनोज तिवारी यांनी केले चुकीचे ट्विट

No fresh Covid 19 test done on Home Minister Amit Shah says MHA | CoronaVirus News: अमित शहांचा कोरोना अहवाल खरंच निगेटिव्ह?; गृह मंत्रालय म्हणतं...

CoronaVirus News: अमित शहांचा कोरोना अहवाल खरंच निगेटिव्ह?; गृह मंत्रालय म्हणतं...

Next

- नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे भाजप नेते मनोज तिवारी यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटल्यानंतर तशा बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. मात्र, या वृत्ताचा आता केंद्रीय गृहखात्याने इन्कार केला आहे.

केंद्रीय गृहखात्यातील एका अधिकाऱ्याने ह्यलोकमत'ला सांगितले की, कोरोनाच्या संसगार्मुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अमित शहा यांची अद्याप पुन्हा चाचणी करण्यात आलेली नाही. अमित शहा यांच्या प्रकृतीबाबत योग्य शहानिशा केल्यानंतरच बातम्या दिल्या जाव्यात अशी अपेक्षाही या अधिकाºयाने व्यक्त केली. भाजपचे नेते व दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केलेल्या टिष्ट्वटबद्दल विचारलेल्या प्रश्नावर या अधिकाऱ्याने उत्तर देणे टाळले.

मनोज तिवारी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, देशाचे यशस्वी गृहमंत्री अमित शहा यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी असल्याचे लक्षात येताच मनोज तिवारी यांनी काही वेळाने हे टिष्ट्वट काढून टाकले.

विजयवाडा येथे एका कोरोना उपचार केंद्राला रविवारी लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्या घटनेबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र शोक व्यक्त केला होता. देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय, कृषी उत्पादन दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारचे चाललेले प्रयत्न अशा काही विषयांवर अमित शहा यांनी सोशल मीडियामध्ये आपली मते रविवारी मांडली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रकृती सुधारत असल्याचे तसेच त्यांना डॉक्टरांनी रेमडेसिव्हिर हे औषध दिले आहे असे सूत्रांनी सांगितले. सध्या चार केंद्रीय मंत्री कोरोना संसगार्मुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

त्यापैकी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान हे देखील मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. अवजड उद्योग व संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे एम्समध्ये तर कृषी खात्याचे राज्यमंत्री कैलास चौधरी हे जोधपूर येथील रुग्णालयात कोरोना संसर्गावर उपचार घेत आहेत.

Web Title: No fresh Covid 19 test done on Home Minister Amit Shah says MHA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.