या पुढे स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार नाही

By Admin | Published: August 15, 2016 06:20 AM2016-08-15T06:20:01+5:302016-08-15T06:30:55+5:30

रेल्वे बजेटचा समावेश मूळ अर्थसंकल्पातच करण्यात यावा, हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडून स्वीकारण्यात आला

No further personal budget will be presented before this | या पुढे स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार नाही

या पुढे स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार नाही

googlenewsNext


नवी दिल्ली : रेल्वे बजेटचा समावेश मूळ अर्थसंकल्पातच करण्यात यावा, हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडून स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे रेल्वेचे स्वतंत्र बजेट असणार नाही.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वर्षानुवर्ष चालणारा हा निर्णय बदलण्याचे पाऊल म्हणजे मोदी सरकारच्या सुधारणांच्या योजनांपैकी एक आहे. यामुळे आता रेल्वेचे प्रवासी भाडे वाढविण्यासारखे निर्णय अर्थमंत्री घेतील.
अर्थात, या निर्णयामुळे रेल्वे मंत्रालयाची स्वायत्तता संपून जाईल, अशी भीती अखिल भारतीय रेल्वे संघाचे महासचिव गोपाल मिश्रा यांनी व्यक्त केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>समिती करणार विलयाचा अभ्यास
अर्थ मंत्रालयाने या विलयाच्या एकूणच स्थितीवर अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
ही समिती ३१ आॅगस्टपर्यंत अहवाल देणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, ‘रेल्वेचे बजेट अर्थसंकल्पासोबतच असावे, यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले होते.’

Web Title: No further personal budget will be presented before this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.