PM Modi in RajyaSabha: यापुढे २०० कोटींपर्यंतचे टेंडर...; रोजगार वाढवण्यासाठी मोदींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:20 PM2022-02-08T12:20:56+5:302022-02-08T12:21:17+5:30

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदींनी मानले देशवासीयांचे आभार

no global Tenders for work up to Rs 200 crore pm narendra modi in rajya sabha | PM Modi in RajyaSabha: यापुढे २०० कोटींपर्यंतचे टेंडर...; रोजगार वाढवण्यासाठी मोदींची मोठी घोषणा

PM Modi in RajyaSabha: यापुढे २०० कोटींपर्यंतचे टेंडर...; रोजगार वाढवण्यासाठी मोदींची मोठी घोषणा

googlenewsNext

नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात सरकारनं केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली. कोरोना संकटात शेती आणि सूक्ष्म, लघु उद्योगांनी अर्थव्यवस्थेला हात दिला. अनेक विकासकामं, प्रकल्पं मार्गी लागले. कोरोना संकट काळात भारतानं केलेल्या प्रयत्नांचं जगभरात कौतुक होत आहे. हे यश देशातील १३० कोटी नागरिकांचं असल्याचं मोदी म्हणाले.

विविध क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीची माहिती मोदींनी राज्यसभेत दिली. यावेळी त्यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली. यापुढे २०० कोटीपर्यंतच्या कामांसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार नाही. अशी कामं भारतातील कंपन्यांनी दिली जातील. त्यामुळे रोजगार वाढतील. लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल, असं मोदी म्हणाले.

मोबाईल उत्पादनात भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ऑटोमोबाईल, बॅटरी निर्मितीत आपला समावेश अग्रगण्य देशांच्या यादीत होतो. इंजिनीयरिंग उत्पादनांची निर्यात वाढली आहे. हे आपल्या देशाचं कौशल्य आहे. संकटाला आपण धीरानं सामोरे गेलो. त्याचं श्रेय देशवासीयांना जातं. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी केलेलं काम तर अतिशय कौतुकास्पद आहे. मी त्यांचे आभार मानतो, असं मोदींनी म्हटलं.

कोरोना काळात कोणकोणती कामं झाली त्याची यादी मोठी आहे. लॉकडाऊन काळात कोणी उपाशी राहू नये यासाठी ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिलं. लाखो लोकांना घरं दिली. घरासाठी येणारा खर्च पाहता आता या व्यक्ती लखपती झाल्या असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. ५ कोटी ग्रामीण कुटुंबाना नळातून पाणी पुरवलं. कोरोना काळात ग्रामीण भागाला लॉकडाऊनपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम दिसला. शेतकऱ्यांनी बंपर उत्पादन घेतलं आणि अर्थव्यवस्थेला हात दिला, असं म्हणत मोदींनी शेतकऱ्यांचे आभार मानले.

Web Title: no global Tenders for work up to Rs 200 crore pm narendra modi in rajya sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.