राज्यात पुढील चार दिवस कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही, हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 07:13 PM2020-06-22T19:13:00+5:302020-06-22T19:22:03+5:30

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

No heavy rains are expected anywhere in the state for the next four days, the Meteorological Department said | राज्यात पुढील चार दिवस कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील चार दिवस कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही, हवामान विभागाचा अंदाज

googlenewsNext
ठळक मुद्देपंजाब ते बंगालचा उपसागर दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण उत्तरेत २४ ते २६ जून दरम्यान अनेक ठिकाणी सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता

पुणे : राज्यात सध्या कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडत असला तरी विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होत आहे. राज्यात पुढील चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता दिसून येत नाही. २३ ते २६ जून दरम्यान राज्यात कोठेही मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 
त्याचवेळी पंजाब ते बंगालचा उपसागर दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तरेत २४ ते २६ जून दरम्यान अनेक ठिकाणी सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, बिहारमध्ये २४ ते २६ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
राज्यात गेल्या २४ तासात अंबरनाथ, भिरा, जव्हार, कल्याण, उल्हासनगर ६०, म्हसाळा, ठाणे ५०, बेलापूर, चिपळूण, गुहागर, हरणाई, पेण, पोलादपूर, सुधागड पाली, केपे, रोहा येथे ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, जामखेड २०, इगतपुरी, लोणावळा, महाबळेश्वर, ओझरखेडा, पन्हाळा पेठ येथे १० मिमी पावसाची नोंद झाली होती. मराठवाड्यात रेणापूर ३०, लातूर, शिरुर अनंतपाल येथे १० मिमी पाऊस झाला. विदर्भात भामरागड ३०, अहिरी एटापल्ली २०, चामोर्शी, धानोरा, घाटंजी, कळंब, कोरची, मुलचेरा, सिरौंचा, वणी येथे १० मिमी पाऊस पडला. 
घाटमाथ्यावरील ताम्हिणी ७०, शिरगाव ६०, डुंगरवाडी ५०, कोयना ४० मिमी पावसाची नोंद झाली होती.पुढील चार दिवसात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़

Web Title: No heavy rains are expected anywhere in the state for the next four days, the Meteorological Department said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.