ना युती, ना आघाडी! मायावतींनी वाढदिवशीच केली मोठी घोषणा; लोकसभा एकट्याने लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 12:20 PM2024-01-15T12:20:58+5:302024-01-15T12:21:32+5:30

उत्तर प्रदेशमध्ये मतदारांना तीन पर्याय मिळणार आहेत. मायावतींनी यादवांनंतर मोदींवरही टीका केली आहे.

No India alliance, no NDA alliance! Mayawati made a big announcement on her birthday; BSP will fight Lok Sabha election alone | ना युती, ना आघाडी! मायावतींनी वाढदिवशीच केली मोठी घोषणा; लोकसभा एकट्याने लढणार

ना युती, ना आघाडी! मायावतींनी वाढदिवशीच केली मोठी घोषणा; लोकसभा एकट्याने लढणार

लखनऊ: लोकसभेला भाजप प्रणित युती विरुद्ध काँग्रेस प्रणित आघाडी असे दोन गट एकत्र येऊन लढण्याची तयारी करत आहेत. असे असताना उत्तर प्रदेशमध्ये मतदारांना तीन पर्याय मिळणार आहेत. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज वाढदिनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्य़ाची मायावतींनी घोषणा केली आहे. 

याचबरोबर मायावतींनी अखिलेश यादवांवर शाब्दिक हल्ला केला आहे. अखिलेश यादव हे सरड्यासारखे रंग बदलत असतात, त्यांच्यापासून सावध रहायला हवे. मी संन्य़ास घेणार अशी अफवा पसरविली जात आहे. मी आताच संन्यास घेणार नाहीय. अखेरच्या क्षणापर्यंत पक्षासाठी काम करत राहीन, असे मायावती यांनी म्हटले आहे. 

मायावतींनी यादवांनंतर मोदींवरही टीका केली आहे. फुकट रेशन देऊन जनतेला गुलाम बनवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप मायावतींनी केला. गेल्या चार सरकारच्या काळात आम्हीच सर्व लोकांच्या कल्याणासाठी आणि सर्व लोकांच्या सुखासाठी काम केले. आमच्यानंतर आलेली सरकारे आमच्या योजनांची कॉपी करून जनतेला विसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाही जातीयवादी, भांडवलशाही आणि संकुचित मानसिकतेमुळे या योजनांचा पूर्ण लाभ लोकांना मिळत नाहीय़, असा आरोप मायावती यांनी केला. 

ना आघाडी, ना युती... मायावतींनी दिले कारण
युती केल्याने पक्षाला फायदा कमी, पण तोटाच जास्त होतो. आपली मतांची टक्केवारीही कमी होते. मात्र इतर पक्षांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे बहुतांश पक्षांना बसपासोबत युती करून निवडणूक लढवायची होती. आमचा पक्ष एकट्याने लोकसभा निवडणूक लढवून चांगले निकाल आणेल. आम्ही एकट्याने निवडणूक लढवतोय कारण त्याचे सर्वोच्च नेतृत्व दलिताच्या हातात आहे. युती केल्याने, बसपची संपूर्ण मते आघाडीच्या पक्षाला जाते, परंतु त्या आघाडीचे मत, विशेषत: सवर्णांचे मत बसपाला पडत नाही. यामुळे आम्हाला आमचा जनाधार टिकवावाच लागेल, असे मायवती म्हणाल्या.
 

Web Title: No India alliance, no NDA alliance! Mayawati made a big announcement on her birthday; BSP will fight Lok Sabha election alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.