नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही; पी. चिदंबरम यांची मोदींवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 05:52 PM2017-09-09T17:52:51+5:302017-09-09T17:58:09+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे.

No intention of nail-making decision was successful; P. Chidambaram's rave reviews on Modi | नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही; पी. चिदंबरम यांची मोदींवर सडकून टीका

नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही; पी. चिदंबरम यांची मोदींवर सडकून टीका

Next
ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे. बनावट चलनी नोटा, दहशतवाद, देशातील काळ पैसा रोखणं यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नसल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हंटलं आहे.

मुंबई, दि. 9- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे. बनावट चलनी नोटा, दहशतवाद, देशातील काळ पैसा रोखणं यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नसल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. नोटांबदी पूर्णपणे अपयशी ठरल्याची थेट टीका पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. नोटाबंदीनंतर दोन हजार रूपयांची नवी नोट चलनात आली. पण त्या दोन हजाराच्या नोटेच्याही बनावट नोटा अनेक ठिकाणी आढळून आल्याचं चिदंबरम यांनी म्हंटलं. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पी. चिदंबरम बोलत होते. 

नोटाबंदीनंतर 2017 या वर्षात काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आणि मृत्यूमुखी पडलेल्या  जवानांच्या संख्येत मोठी वाढ झाली. काळ्या पैशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तामिळनाडूच्या आर के नगर मतदारसंघातली निवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली. या निवडणूकीत वापरलेला पैसा काळ होता की पांढरा?  भाजपने देशात अनेक सभा घेतल्या त्या सभांचा व्यवहार चेकने केला का? असे सवालही चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत. मोदींनी केलेली नोटाबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असं मत चिदंबरम यांनी मांडलं. 

नोटाबंदीमुळे विकासदर दोन टक्क्याने कमी होईल, असं मनमोहन सिंह म्हणाले होते.  ते खरं ठरलं असून सलग सहाव्या तिमाहीत विकासदरात घसरण झाली.  तसंच येणा-या तिमाहीत ही घसरण कायम राहील. आता भारत ही जगात सर्वात वेगाने वाढणारी व्यवस्था राहिली नाही, असं म्हणतं पी चिंदबरम यांनी घसरलेल्या जीडीपीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. नव्या नोटांची छपाई करण्यालक 8 हजार कोटींचा खर्च झाला. तसंच नोटांची वाहतूक, जुन्या नोटा जमा करणं, त्या जुन्या नोटांची विल्हेवाट लावणं,  यावर झालेला तसंच होणारा खर्च वेगळा आहे.  नोटाबंदीवर 21000 कोटी खर्च झाले. असंही चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाला धाडसी निर्णय म्हंटलं होतं. पण चुकीचे निर्णय घ्यायला धाडस लागत नाही. चुकीची जबाबदारी स्वीकारायला धाडस लागतं, असा टोला चिंदबरम यांनी मोदींना लगावला आहे.  नोटाबंदीमुळे जानेवारी 2017 या एका महिन्यात 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या . तर 104 लोकांचा मृत्यू झाला. लघु आणि मध्यम उद्योग बंद झाले. उत्पादन घटलं, मागणी घटली, कृषी विकासदर घटला, निर्यातही घटली.  सरकार दरवर्षी दोन कोटी नव्या नोकऱ्या देणार होतं मग नोकऱ्या कुठे आहेत?, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.
 

Web Title: No intention of nail-making decision was successful; P. Chidambaram's rave reviews on Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.