यापुढे राज्यसभेवर जाणार नाही... ईश्वरलाल जैन: पक्षात सक्रीय राहू

By admin | Published: February 14, 2016 12:43 AM2016-02-14T00:43:07+5:302016-02-14T00:43:07+5:30

जळगाव : यापुढे आपण राज्यसभेत जाणार नाही. पक्षाने भरपूर संधी दिली, कामेही केली. पक्षाचे काम करू मात्र भविष्यातील काळ हा जास्तीत जास्त कुटुंबाबरोबर घालविण्याचा मनोदय खासदार ईश्वराल जैन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

No longer going to Rajya Sabha ... Ishwarlal Jain: Stay active in the party | यापुढे राज्यसभेवर जाणार नाही... ईश्वरलाल जैन: पक्षात सक्रीय राहू

यापुढे राज्यसभेवर जाणार नाही... ईश्वरलाल जैन: पक्षात सक्रीय राहू

Next
गाव : यापुढे आपण राज्यसभेत जाणार नाही. पक्षाने भरपूर संधी दिली, कामेही केली. पक्षाचे काम करू मात्र भविष्यातील काळ हा जास्तीत जास्त कुटुंबाबरोबर घालविण्याचा मनोदय खासदार ईश्वराल जैन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
खासदार जैन यांच्या खासदारकीची मुदत ४ जुलै रोजी संपत आहे. मिळालेल्या संधीमुळे ४०० ते ४५० खासदारांशी ओळखीची संधी मिळाली. त्यात सर्वपक्षीयांचा समावेश होता. वित्त, संरक्षण व आता पेट्रोलियम समितीवर काम करत आहोत. आपणासाठी पद हे गौण आहे. पक्षाने संधी दिली त्या माध्यमातून विविध कामेही केली. मात्र आता राज्यसभेवर पुन्हा जाणार नाही.
सागवान प्रकरणासह विविध आरोप आपणावर झाले पण त्यातून तावून सलाखून निघालो. अगदी आपल्या व्यवसायांवर अफवा पसरविल्या गेल्या. शोरूम विकल्याचे सांगण्यात आले. आपले पूत्र माजी आमदार मनीष जैन हे आफ्रिकेत टांझानिया येथे आहेत. सोन्याशी संबंधित व्यवसाय ते करीत आहेत. जवळपास पाच प्लॅँट ते तेथे टाकत आहेत. येथे परतण्याबाबत ते स्वत:च भविष्यात निर्णय घेतील.
----
इन्फो. ...
दोषींवर कारवाई व्हावी
जिल्हा बॅँकत पूर्वीच्या काळात गैरव्यवहार झाले. जे आरोप असतील त्याची सत्ताधारी गटाने चौकशी करावी. आपल्या कारकिर्दी अगोदरही काही गैरव्यहार झाले. अतिशय अनागोंदी पूर्वी होती. मात्र बॅँकेला सुस्थितीत आणण्याचा आपण प्रयत्न केला. त्याचेच दृश्य परिणाम आता दिसत आहेत. तेव्हा केलेले परिश्रम, कामामुळे बॅँक तरली. नाही तर इतर बॅँकांप्रमाणे या बॅँकेचाही परवाना गेला असता, असेही खासदार जैन म्हणाले.

Web Title: No longer going to Rajya Sabha ... Ishwarlal Jain: Stay active in the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.