आता १० आकडी नाही, मोबाईल क्रमांक मोठा होणार; ट्रायचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 21:13 IST2020-05-29T20:58:51+5:302020-05-29T21:13:00+5:30
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने आज एक प्रस्ताव सादर केला आहे. देशात एकूण १००० कोटी नंबरची क्षमता निर्माण होणार आहे.

आता १० आकडी नाही, मोबाईल क्रमांक मोठा होणार; ट्रायचा प्रस्ताव
नवी दिल्ली : आज प्रत्येकाकडे मोबाईल, स्मार्टफोन आहे. यामध्ये नाही म्हटले तरी दोन दोन सिम वापरली जातात. या सिमचा क्रमांक १० आकडी असतो. हे लवकरच इतिहासजमा होणार आहे. कारण ट्रायने तसा प्रस्ताव दिला आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने आज एक प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये मोबाईलचे ११ आकडे असावेत असे म्हटले आहे. यानुसार सध्याच्या ग्राहकांना ११ अंकांचा नंबर घ्यावा लागणार आहे. यामुळे आतापेक्षा जास्त मोबाईल क्रमांक उपलब्ध होऊ शकणार आहेत.
जर मोबाईल नंबरचा पहिला क्रमांक ९ ठेवण्यात आला तर १० वरून ११ आकड्यांवर जाण्याने देशात एकूण १००० कोटी नंबरची क्षमता निर्माण होणार आहे. ट्रायने सांगितले की, ७० टक्के वापर आणि सध्याच्या योजनेनुसार देशात ७०० कोटी कनेक्शन उपलब्ध होण्यासाठी हे पुरेसे असणार आहे.
याशिवाय फिक्स्ड लाईनवरून कॉल करताना मोबाईल नंबरच्या आधी '0' नंबर डायल करावा लागणार आहे. सध्या इंटर-सर्विस एरिया मोबाईल कॉलसाठी '0' नंबर डायल करावा लागत आहे. ट्रायने सांगितले की, असे केल्याने मोबाईलवर कॉल केल्याने लेव्हल 2, 3, 4 आणि 6 मध्ये सर्व फ्री सब-लेवल्सला मोबाईल नंबरसारखे वापरता येणार आहे.
याशिवाय एक नवीन राष्ट्रीय नंबरिंग योजनेचीही सुरुवात केली जाणार आहे. ही लवकरात लवकर उपलब्ध करावी लागणार आहे. तसेच डोंगल्ससाठी वापर होणाऱ्या मोबाईलचा नंबर १० आकड्यांवरून १३ अंक करण्याचेही सुचविण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Shocking! 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले
प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन
छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन
कर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात
Lockdown 5: मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महामंथन; 1 जूनपासून पुढे काय?
अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार