मंदिरात आता ‘सलाम’ नव्हे; तर ‘संध्या आरती’; तब्बल ३०० वर्षांपूर्वीची परंपरा बदलली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:01 AM2022-12-12T11:01:27+5:302022-12-12T11:01:40+5:30

हिंदू मंदिरांवर देखरेख करणाऱ्या मुझराई या राज्य प्राधिकरणाने सहा महिन्यांच्या जुन्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

No more 'Salam' in the temple; So 'Sandhya Aarti'; The tradition of almost 300 years ago changed | मंदिरात आता ‘सलाम’ नव्हे; तर ‘संध्या आरती’; तब्बल ३०० वर्षांपूर्वीची परंपरा बदलली

मंदिरात आता ‘सलाम’ नव्हे; तर ‘संध्या आरती’; तब्बल ३०० वर्षांपूर्वीची परंपरा बदलली

googlenewsNext

बंगळुरू : कर्नाटकातील काही मंदिरांतील ‘सलाम आरती’चे नाव बदलण्यात आले आहे. आता ती ‘संध्या आरती’ म्हणून ओळखली जाईल. हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आला. १८व्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या नावाने केले जाणारे विधी रद्द करण्याची मागणी या संघटनांनी सरकारकडे केली होती. 

हिंदू मंदिरांवर देखरेख करणाऱ्या मुझराई या राज्य प्राधिकरणाने सहा महिन्यांच्या जुन्या प्रस्तावाला मंजुरी दिली. १८ व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू सुलतान यांनी या मंदिरांना दिलेल्या भेटीदरम्यान आरतीचे नाव ‘सलाम आरती’ केले होते. धार्मिक परिषदेचे सदस्य, कशेकोडी सूर्यनारायण भट यांनी नाव बदलण्याची मागणी केली. मंत्री शशिकला जोल्ले यांनी सांगितले की, ही फारशी नावे बदलून मंगला आरती नमस्कार किंवा आरती नमस्कार यांसारखी नावे ठेवण्याची मागणी होती.

काय आहे इतिहास?
मेलकोटे येथे ऐतिहासिक चालुवनारायण स्वामी मंदिर आहे. जिथे हैदर अली आणि त्यांचा मुलगा टिपू सुलतान यांच्या कारकिर्दीपासून रोज संध्याकाळी ७ वाजता सलाम आरती (मशाल सलाम) होत आहे.

Web Title: No more 'Salam' in the temple; So 'Sandhya Aarti'; The tradition of almost 300 years ago changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.