रिचार्ज करायला नंबर सांगायची गरज नाही, व्होडाफोनची नवी सेवा
By admin | Published: February 26, 2017 11:21 AM2017-02-26T11:21:56+5:302017-02-26T11:21:56+5:30
टेलीकॉम कंपनी व्होडाफोनने नवी सेवा सुरु केली आहे. याद्वारे रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना नंबर सांगण्याची गरज नाही.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई , दि. 26 - टेलीकॉम कंपनी व्होडाफोनने नवी सेवा सुरु केली आहे. याद्वारे रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना नंबर सांगण्याची गरज नाही. प्रायव्हेट रिचार्ज मोड म्हणजे ‘पीआरएम’ असं या सेवेचं नाव असून पश्चिम बंगालमध्ये सध्या ही सेवा सुरु करण्यात आली आहे. लवकरच देशभरात ही सेवा सुरु करण्याची शक्यता आहे.
वन टाईम पासवर्ड म्हणजे ओटीपीद्वारे नंबर न सांगता रिचार्ज करता येणार आहे. या ओटीपीवरच रिचार्ज होईल. यासाठी पीआरएम मोडचा पर्याय निवडावा. त्यानंतर PRIVATE असं लिहून 12604 या क्रमांकावर मेसेज करावा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवण्यात येईल. ऑनलाईन रिचार्ज करतानाही हा ओटीपी वापरता येईल.
अशा प्रकारची सेवा देणारी व्होडाफोन इंडिया पहिलीच टेलीकॉम कंपनी ठरली आहे.