कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही: रणदीप गुलेरिया

By जयदीप दाभोळकर | Published: January 3, 2021 04:05 PM2021-01-03T16:05:46+5:302021-01-03T16:08:10+5:30

सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी आज देण्यात आली परवानगी

No need to worry about corona vaccine safety aiims director Randeep Guleria | कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही: रणदीप गुलेरिया

कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही: रणदीप गुलेरिया

Next
ठळक मुद्देकोविशिल्ड, कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालिन परिस्थितीतल वापरास देण्यात आली परवानगीलसीबद्दल विचार करताना सुरक्षिततेची काळजीही घेतली जाते, गुलेरिया यांचं वक्तव्य

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयने ही माहिती दिली. डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली. यानंतर काही नेत्यांकडून लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. परंतु लसीच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचं मत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं.

"हा देशासासाठी फार मोठा दिवस आहे आणि नववर्षांची सुरूवात करण्याचीही उत्तम पद्धत आहे. दोन्ही लसींची निर्मिती भारतातच झाली आहे हे ते कॉस्ट इफेक्टिव्हही आहेत. आपण लवकरच या लसी लाँच केल्या पाहिजेत," असं मत गुलेरिया यांनी व्यक्त केलं. "कोणत्याही लसीचा विचार करताना त्याच्या सुरक्षिततेबाबत सर्वतोपरी विचार केला जातो. यासाठीच लस निरनिराळ्या टप्प्यांतून जाते. यातूनच ती लस सुरक्षित आहे याची निश्चिती केली जाते. यानंतर आपण मानवी चाचणीकडे येतो. सर्व माहिती तज्ज्ञांद्वारे पाहिली जाते आणि त्यानंतरच लसीला मंजुरी दिली जाते," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

सुरूवातीला सीरमची लस देणार

सुरूवाती टप्प्यात सीरम इन्स्टिट्यूटची लस दिली जाणार आहे. सीरमकडे सध्या ५० दशलक्ष डोस उपलब्ध आहेत. सुरूवातीच्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणादरम्यान सीरम आपल्याला लसीचा पुरवठा करू शकतं. जसजसं आपण पुढे जाऊ तसा भारत बायोटेकच्या लसीच्या डेटादेखील उपलब्ध असणार असल्याचं गुलेरिया यांनी नमूद केलं. 






"सध्या लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच लसींची चाचणी सुरू ठेवणं आणि त्यांचा डेटा मिळवत राहणं आवश्यक आहे. एकदा अधिक डेटा आल्यानंतर आपल्याला त्या लसीच्या सुरक्षिततेबाबत अधिक आत्मविश्वास येईल," असंही गुलेरिया यांनी नमूद केलं. "जर आपात्कालिन परिस्थितीत जर रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली तर अशा परिस्थितीत आपल्याला लसीकरणाची गरज भासेल. त्यावेळी भारत बायोटेकच्या लसीचाही वापर केला जाईल. अशा परिस्थितीत सीरम इन्स्टिट्यूटची लस किती प्रभावी ठरेल याची खात्री नसेल तेव्हादेखील याचा बॅकअप म्हणून वापर करता येऊ शकेल," असंही ते म्हणाले.



सुरूवातीला सीरमची लस देणार

सुरूवाती टप्प्यात सीरम इन्स्टिट्यूटची लस दिली जाणार आहे. सीरमकडे सध्या ५० दशलक्ष डोस उपलब्ध आहेत. सुरूवातीच्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणादरम्यान सीरम आपल्याला लसीचा पुरवठा करू शकतं. जसजसं आपण पुढे जाऊ तसा भारत बायोटेकच्या लसीच्या डेटादेखील उपलब्ध असणार असल्याचं गुलेरिया यांनी नमूद केलं. 

Web Title: No need to worry about corona vaccine safety aiims director Randeep Guleria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.