रेल्वेचा नवा नियम, हाफ तिकीटावर मिळणार नाही सीट

By Admin | Published: March 29, 2016 02:12 PM2016-03-29T14:12:45+5:302016-03-29T19:52:54+5:30

नव्या नियमानुसार 5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी आता हाफ तिकीट मिळणार नसून त्यांना फुल तिकीटच काढाव लागणार आहे

No new train rule, half-seat seat | रेल्वेचा नवा नियम, हाफ तिकीटावर मिळणार नाही सीट

रेल्वेचा नवा नियम, हाफ तिकीटावर मिळणार नाही सीट

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २९ - रेल्वेने लहान मुलांच्या तिकीट दरातील नियमांत बदल केले असून एप्रिल महिन्यापासून हा बदल लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार 5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी आता हाफ तिकीट मिळणार नसून त्यांना फुल तिकीटच काढाव लागणार आहे. 22 एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात येईल. ५ वर्षांखालील मुले मात्र पूर्वीप्रमाणेच मोफत प्रवास करू शकणार आहेत.
 
आरक्षण करतेवेळी सीट किंवा बर्थचं आरक्षण करत असाल आणि तुमच्यासोबत जर 5 ते 12 वर्षांमधील मुल असेल तर तुम्हाला पुर्ण तिकीटाचा दर भरावा लागणार आहे. अन्यथा मुलाला पालकांसोबत किंवा नातेवाईकांसोबत सीट शेअर करावी लागणार आहे. आरक्षित नसणा-या तिकीटांमध्ये मात्र हा नियम लागू करण्यात येणार असून तिथे हाफ तिकीट मिळणार आहे. सध्याच्या नियमानुसार 5 ते 12 वयोगटातील मुलाची हाफ तिकीट काढली असता त्यांना पुर्ण जागाही मिळते. पण हा नियम लागू झाल्यानंतर हाफ तिकीटमध्ये जागा मिळणार नाही त्यासाठी पुर्ण तिकीटच काढावं लागणार आहे.
 
या नव्या निर्णयामुळे २ कोटी अधिक प्रवाशांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणार आहे. तसेच यामुळे रेल्वेला ५२५ कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ साली २.११ कोटी मुलांनी हाफ तिकीटावर प्रवास केला होता. आता रेल्वे आरक्षणाचा फॉर्मही बदलणार आहे ज्याद्वारे ५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी पूर्ण जागा आरक्षित करता येईल. 
 

Web Title: No new train rule, half-seat seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.