शोधायला गेले नोटा, हाती लागलं भंगार!
By admin | Published: November 9, 2016 03:33 PM2016-11-09T15:33:59+5:302016-11-09T15:37:27+5:30
आज सकाळी गाझियाबादमधील एका दफनभूमीत एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचे खोके फेकण्यात आल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली.
Next
>ऑनलाइन लोकमत
गाझियाबाद, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यापासून आपल्याकडे असलेल्या या नोटांची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न अनेकांना पडलाय, त्याचदरम्यान आज सकाळी गाझियाबादमधील एका दफनभूमीत एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचे खोके फेकण्यात आल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली.
दफनभूमीत पैसे फेकण्याची वार्ता पसल्याचे समजताच लोकांनी त्या दिशेने धाव घेतली. बघ्यांची गर्दी उसळली. दरम्यान या घटनेची वर्दी कुणीतरी पोलिसांनाही दिली. बातमीची दखल घेत पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पण पोलिसांनी संशयित खोके उघडून पाहिले असता त्यात धागे आणि भंगार आढळून आले. दरम्यान, 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.