आणखी एक डोकलाम सहन होणार नाही; चीन राजदूताचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:31 AM2018-06-19T04:31:54+5:302018-06-19T04:31:54+5:30

भारत-चीन द्विपक्षीय संबंधांना आणखी एका डोकलाम प्रकरणाचा ताण सहन होणार नाही, असे चीनचे भारतातील राजदूत लुवो झावोहुई यांनी सोमवारी येथे म्हटले.

No one else will endure anymore; Chinese ambassador vote | आणखी एक डोकलाम सहन होणार नाही; चीन राजदूताचे मत

आणखी एक डोकलाम सहन होणार नाही; चीन राजदूताचे मत

नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधांना आणखी एका डोकलाम प्रकरणाचा ताण सहन होणार नाही, असे चीनचे भारतातील राजदूत लुवो झावोहुई यांनी सोमवारी येथे म्हटले.
सीमा प्रश्नांवर विशेष प्रतिनिधींच्या बैठकीतून उभय देशांना स्वीकारार्ह होईल, असे उत्तर शोधले गेले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. भारतीय मित्रांनी भारत, चीन आणि पाकिस्तानचा सहभाग असलेल्या त्रिपक्षीय सहकार्य शांघाय को-आॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या (एससीओ) मदतीने घ्यावे अशी सूचना केली असून ती खूपच विधायक आहे, असे त्यांनी सांगितले.
सुरक्षा सहकार्य हे एससीओच्या तीन स्तंभांपैकी एक आहे. त्यात चीन, भारत व पाकिस्तान हे त्रिपक्षीय स्वरूपाचे सहकार्य करू शकतील, अशी सूचना काही भारतीय मित्रांनी केल्याचे ते म्हणाले.

Web Title: No one else will endure anymore; Chinese ambassador vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.