'भाजपा सरकारनं शिवाजी महाराजांसाठी जेवढं केलं तेवढ कुणीच नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:45 PM2019-01-03T16:45:50+5:302019-01-03T16:46:58+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शहांनी भाजपा खासदारांची बैठक घेतली.
नवी दिल्ली - भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील भाजपा खासदारांची दिल्लीत बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शहांनी भाजपा खासदारांची बैठक घेतली. त्यावेळी शहांनी युतीबद्दलची आपली भूमिका मोजक्या शब्दांमध्ये स्पष्टपणे मांडली. या बैठकीला खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आणि नारायण राणे हेही हजर होते. या बैठकीनंतर संभाजीराजेंनी भाजपाचे कौतुक केलं. भाजपा सरकारनं जेवढं काम छत्रपती शिवाजी महाराजांसाठी केलं, तेवढं कुणीच केल नाही, असे संभाजीराजेंनी म्हटलंय.
अमित शहांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खासदारांची बुधवारी दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्रात युती करायची असेल, तर काही गमावून का करायची? काही गमावून अजिबात युती केली जाणार नाही, असं शहा म्हणाले. शिवसेना भाजपा युतीसह आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची रणनितीही या बैठकीत ठरविण्यात आली. त्यानुसार, भाजपा खासदारांना तयारीला लागा, असे अमित शहांनी सांगितल्याचे समजते. विशेष म्हणजे या बैठकीला भाजपा खासदारांसह राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजीराजे आणि भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त असलेले खासदार नारायण राणे हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर संभाजीराजेंनी भाजपाचे मोठे कौतुक केलं आहे. भाजपाने शिवाजी महाराजांसाठी खूप काम केले, या सरकारने जेवढं केलं तेवढं इतर कुठल्याही सरकारने केल नसल्याचं संभाजीराजेंनी म्हटले आहे.