आनंदाला पारावार रहात नाही... दिलीप दहाड: वहनाचे होते स्वागत
By Admin | Published: November 15, 2015 09:12 PM2015-11-15T21:12:38+5:302015-11-15T21:12:38+5:30
जळगाव : दिवाळीपेक्षा वहन घरी कधी येणार याची अतिशय आतुरतेने कुटुंबिय वाट पहात असतात अशी भावना सुयोग कॉलनीतील रहिवासी दिलीप दहाड यांनी व्यक्त केली.
ज गाव : दिवाळीपेक्षा वहन घरी कधी येणार याची अतिशय आतुरतेने कुटुंबिय वाट पहात असतात अशी भावना सुयोग कॉलनीतील रहिवासी दिलीप दहाड यांनी व्यक्त केली. रविवारी सिंहाचे वहन होते. हे वहन सुयोग कॉलनीत येणार म्हणून परिसरात आनंदाचे वातावरण होते. या कॉलनीतील रहिवासी दिलीप दहाड यांच्याकडे या कॉलनीतील रहिवासानंतर १५ वर्षांपासून वहन येत असते. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, दिवाळीची जशी उत्सुकता असते त्यापेक्षा अधिक उत्सुकता आमच्या कुटुंबियांना वहन कधी येणार म्हणून असते. त्यापूर्वी आम्ही शनिपेठेत रहात होतो. तेथे वडिल, आजोबा यांच्या काळातही वहन येत असे. वहन येणार म्हणून घरावर, परिसरात लायटिंग करणे, रांगोळ्या काढणे असे कुटुंबिय उत्साहाने करत असतात. वृद्ध-आई वडिलांना तर यातून अतिशय आनंद मिळतो. आमचे एकत्र कुटंुब. चार भाऊही बरोबर असतात. त्यामुळे सर्वांचाच तयारील हातभार लागतो. या निमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र येतात. तसेच कॉलनीतील नागरिकांनाही याची उत्सुकता असते. तेदेखील घरासमोर रांगोळ्या गाढून स्वागत करतात. आरती देतात. पानसुपारीचा कार्यक्रम, भारूडाचा कार्यक्रम तर अतिशय रंगत आणतो. पान सुपारीच्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष ह.भ.प. मंगेश महाराज व अन्य येतात. त्यांच्या स्वागतासाठी सारे कुटुंबिय पुढे सरसावतात. अतिशय आनंदाचा असा तो क्षण असतो. अतिशय भक्तीमय असे वातावरण या निमित्ताने होते. संतांचे पाय परिसरास लागल्याचे मोठे समाधान परिवारास मिळते. ----पासपोर्ट फोटो