गोव्यात कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही
By admin | Published: June 19, 2017 01:39 AM2017-06-19T01:39:40+5:302017-06-19T01:39:40+5:30
बोलण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे; परंतु कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आझाद मैदानात क्रांतिदिन
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : बोलण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे; परंतु कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आझाद मैदानात क्रांतिदिन कार्यक्रमात रविवारी दिला. रामनाथी-फोंडा येथे झालेल्या हिंदू संमेलनातील प्रक्षोभक भाषणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
पर्रीकर म्हणाले, काही जण गोव्यात येतात आणि गोव्याशी काहीही संबंध नसलेले विषय उपस्थित करतात. संबंधित विषयांवर राज्याची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही कायदा पाळणारे आहोत. हिंदू संमेलनात छिंदवाडा (मध्यप्रदेश) सनातन धर्म प्रचार सेवा समितीच्या अध्यक्षा साध्वी सरस्वती यांनी बीफ खाणाऱ्यांना भर चौकात फासावर लटकवा, असे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांनी उपरोक्त भूमिका मांडली.