अरेस्ट तर कोणाचा बापही करू शकत नाही, बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 12:20 PM2021-05-26T12:20:58+5:302021-05-26T12:21:36+5:30

रविवारी आरोग्य मंत्र्यांने झापताच रामदेव बाबांनी अॅलोपथीवरील वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले होते. मात्र, मी कोणतीही पदवी न घेता डॉक्टर बनलो, अॅलोपथीचे डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी कसे पडतात असा सवाल केला आहे.

No one's father can be arrested me, Baba Ramdev's direct reply on IMA demand | अरेस्ट तर कोणाचा बापही करू शकत नाही, बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल

अरेस्ट तर कोणाचा बापही करू शकत नाही, बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देरामदेव बाबांच्या वक्तव्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यावरुन बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या अटकेचा ट्रेंड चालवला जातो, कधी रामदेव ठग असल्याचा ट्रेंड चालवला जातो.

मुंबई - योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी एलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर चांगलाच वाद उफाळून आला आहे. बाबा रामदेव यांनी एलोपॅथीनंतर पुन्हा एकदा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता, बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलंय.  

रविवारी आरोग्य मंत्र्यांने झापताच रामदेव बाबांनी अॅलोपथीवरील वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले होते. मात्र, मी कोणतीही पदवी न घेता डॉक्टर बनलो, अॅलोपथीचे डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी कसे पडतात असा सवाल केला आहे. तर, एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांना रामदेव यांना चांगलच फैलावर घेतलं. डॉ. लेलेंसोबतच्या चर्चेचा बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, आता अटकेसंदर्भात रामदेव यांनी केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

रामदेव बाबांच्या वक्तव्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यावरुन बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या अटकेचा ट्रेंड चालवला जातो, कधी रामदेव ठग असल्याचा ट्रेंड चालवला जातो. त्यांना ट्रेंड चालवू द्या, आता आम्हीही ट्रेंड शिकलो आहोत, आमचा ट्रेंड सर्वात वरी असतो, असे बाबांनी म्हटलंय. तसेच, अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता..., असेही रामदेव बाबा म्हणाले आहेत.  


हंसल मेहतांची बाबा रामदेववर टीका

हंसल मेहता यांनीही बाबा रामदेव यांना इडियट म्हटलं आहे. रामदेव बाबांनी ट्विट करत आयएमएला २५ प्रश्न विचारले आहेत. अमेरिकेचे डॉक्टर बोलतात, डब्ल्यूएचओ म्हणते तेव्हा का नाही बोलत कोणी? मी जर डॉक्टरांचा आणि मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तर तुम्ही आयुर्वेदाचा सन्मान का करत नाही असा सवाल त्यांना केला आहे. त्यावरुन, पुन्हा एकदा रामदेव बाबांवर टीका करण्यात आलीय. 
बाबा रामदेव यांच्या या ट्विटला रिट्विट करत, हा मूर्ख माणूस आमच्या फ्रंटलाईन वर्कर्सचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहे, असे हंसल मेहता यांनी म्हटलंय. 

आयुर्वेदावर टीका करणे, शिव्या का दिल्या जातात. फार्मा कंपन्या खूप आहेत, मग डॉक्टर त्यांचे बळी का ठरत आहेत. डॉक्टर तर एका फार्मा कंपनीचा प्रतिनिधी नसतो, अशा शब्दांत रामदेव बाबांनी 25 सवाल आयएमएला केले आहेत. त्यावरुन, हंसल मेहता यांनी बाबांना मूर्ख म्हटलं आहे.  

डॉ. लेलेंनी केली बोलती बंद

बाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथीसंदर्भातील व्हिडिओनंतर आयोजित आज तकच्या डिबेट शोमध्ये डॉ. लेले जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलती बंद केली. डॉ. लेले अॅलोपॅथीसंदर्भात बोलत असताना बाबा रामदेव मध्ये-मध्ये बोलायचे. त्यावरुन, डॉ. लेले चांगलेच संतापले होते. ऐ चुप्प... चुप्प... असे म्हणत लेले यांनी रामदेव बाबांची बोलती बंद केली. त्यानंतर, बाबांनीही प्रतिक्रिया देत आप कौन है.. मुझे चुप बैठानेवाले असे म्हणत उत्तर दिले. मात्र, सोशल मीडियावर डॉ. लेले यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांना समर्थन मिळत आहे. तर, काहीजण डॉ. लेलेंना ट्रोलही करत आहे. पण, सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहेत. 
 

Web Title: No one's father can be arrested me, Baba Ramdev's direct reply on IMA demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.