Covishield Production Cut : केंद्राकडून लसीची ऑर्डर मिळाली नाही, कोविशील्डचे उत्पादन 50 टक्के कमी करणार : अदर पूनावाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 06:52 PM2021-12-07T18:52:53+5:302021-12-07T18:55:49+5:30
Adar Poonawalla : अमेरिकेने लसीच्या डोससाठी मोठी देणगी दिली आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत, असे अदर पूनावाला म्हणाले.
पुणे : पुढील आठवड्यापासून कोविशील्ड लसीचे (Covishield vaccine) उत्पादन किमान 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी घेतला आहे. फार्मास्युटिकल फर्मकडे कोविड-19 लसीसाठी केंद्राकडून कोणतेही आदेश नाहीत, असे सांगत आफ्रिकेच्या विविध नेत्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही कोवॅक्सद्वारे 400-500 मिलियन डोसच्या ऑर्डरची समीक्षा केली आहे. अमेरिकेने लसीच्या डोससाठी मोठी देणगी दिली आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत, असे अदर पूनावाला म्हणाले.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी ऑक्टोबरमध्ये News18.com ला सांगितले होते की, आम्ही लसींच्या निर्यातीबाबत भारत सरकारकडून योग्य सूचनांची वाट पाहत आहोत. COVAX कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटना (WHO), UNICEF आणि कोअलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेयर्डनेस इनोव्हेशन (CEPI) सह Gavi वॅक्सिन संस्थेद्वारे प्रायोजित आहे. गावी स्वतः संयुक्त राष्ट्र-समर्थित संस्था आहे, जी जगभरातील लसीकरणाचे समन्वय करते. दरम्यान, भारतातील कोरोना लस कार्यक्रमाचा कणा मानल्या जाणार्या कोविशील्डची निर्माती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रति महिना 22 कोटी डोसची उत्पादन क्षमता वाढवली आहे. अदर पूनावाला म्हणाले, 'सध्या आम्ही लसींच्या निर्यातीबाबत भारत सरकारकडून योग्य सूचना देण्याची वाट पाहत आहोत.'
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित मुलांसाठी एक कोरोना लस फेब्रुवारीपर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अदर पूनावाला यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कंपनीत सुरू असलेल्या चाचण्यांमध्ये कोणत्याही प्रकारची घाई होणार नाही. अदर पूनावाला म्हणाले, "आम्ही फेब्रुवारी 2022 पर्यंत मुलांसाठी कोवोवॅक्स लाँच करण्यास उत्सुक आहोत. सध्या आम्ही ट्रायलच्या टप्प्यातून जात आहोत. आम्ही यासाठी फास्ट-ट्रॅक चाचण्या करणार नाही, विशेषत: तसे करण्याची आवश्यकता वाटत नाही."
अदर पूनावाला यांनी CNBC TV-18 ला विशेष मुलाखतीत दिली होती. यावेळी ते होते की, एस्ट्राजेनेकासोबत भागीदारी केली होती. नक्की कोणती लस काम करेल, हे आम्हाला माहीत नव्हते. आम्ही इतर उत्पादकांसह मोठ्या समस्या पाहिल्या आहेत. एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डसोबत आम्ही चांगले काम करत आहोत. आम्ही काही कंपन्यांशी फिल अँड फिनिशसाठी चर्चा करत आहोत. अनेक भागीदारांसह फिल-फिनिश केले जाऊ शकते. कोवोवॅक्सला बायोकॉनवर किंवा आमच्या फॅसिलिटीमध्ये भरले जाऊ शकते.