आम्हाला बाहेरच्यांनी सल्ला देऊ नये, सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 10:54 PM2018-04-04T22:54:39+5:302018-04-04T22:54:39+5:30
बाहेरच्यांनी आम्हाला काय करावे आणि काय करु नये, याबाबत सल्ला देण्याची गरज नाही, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईत खात्मा करण्यात आलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सहानुभूती व्यक्त केली आहे. त्याने लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात गरळ ओकत ट्विट केले. यामध्ये त्याने काश्मीरमधील स्थिती गंभीर असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रसह आतंरराष्ट्रीय संघटनांच्याबाततीत सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे.
शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटवर भारताचा कर्णधार विराट कोहली, गौतम गंभीर, सुरेश रैना आणि कपिल देव यांनी त्याला चांगलेच धारेवर धरल्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुद्धा त्याला फटकारले आहे. आमचा देश चालविण्यासाठी आमच्याकडे सक्षम लोक आहेत. बाहेरच्यांनी आम्हाला काय करावे आणि काय करु नये, याबाबत सल्ला देण्याची गरज नाही, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले आहे.
We have got capable people to manage & run our country. No outsider needs to know or tell us what we need to do: Sachin Tendulkar on #ShahidAfridipic.twitter.com/m89ACfPVEn
— ANI (@ANI) April 4, 2018
दरम्यान, बंगळुरु येथे सध्या विराट कोहली आयपीएलचा सराव करत आहे. यावेळी त्याला काही पत्रकारांनी शाहिद आफ्रिदीने केलेल्या ट्विटबद्दल विचारले. त्यावर देशाविरोधात गरळ ओकणाऱ्याला कधीच माफ करणार नाही, असे कोहलीने म्हटले आहे. तो म्हणाला, एक भारतीय म्हणून तुम्ही नेहमीच देशाच्या हिताचा विचार करता. पण जर कोणी माझ्या देशाविरोधात कुणी काही बोलणार असेल तर ते कधीच खपवून घेतले जाणार नाही.
But having said that, it's a very personal choice for someone to comment about certain issues. Unless I have total knowledge of the issues & the intricacies of it I don't engage in it but definitely your priority stays with your nation: Virat Kohli on #ShahidAfridi (2/2) pic.twitter.com/JFDwrbOMk5
— ANI (@ANI) April 4, 2018
याचबरोबर, शाहिद आफ्रिदीच्या ट्विटवर कपिल देव म्हणाले यांनी सुद्धा जास्त महत्व दिले नाही. हा शाहिद आफ्रिदी कोण आहे? त्याला आपण एवढे महत्व का देत आहोत. या प्रकारच्या लोकांना आपण जास्त महत्व देता कामा नये, असे म्हटले आहे.