"रेल्वेसेवा स्थगिती, कपातीचा विचार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 06:20 AM2021-04-10T06:20:07+5:302021-04-10T06:21:50+5:30
कोरोनामुळे रेल्वेसेवा कमी वा बंद करावी, अशी चर्चा राज्यात सुरू असताना रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांनी हे म्हटले आहे.
नवी दिल्ली : रेल्वेसेवा स्थगित करण्याचा किंवा गाड्यांच्या संख्येत कपात करण्याचा काेणताही विचार नसल्याचे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. लाॅकडाऊनच्या भीतीने स्थलांतिरत मजूर पुन्हा गावी परण्यासाठी रेल्वेस्थानकांवर दिसू लागले आहेत. कोरोनामुळे रेल्वेसेवा कमी वा बंद करावी, अशी चर्चा राज्यात सुरू असताना रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांनी हे म्हटले आहे.
देशभरात काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातही दरराेज ५५ ते ६० हजार नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रेल्वेसेवा कमी वा बंद करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, शर्मा यांनी राज्य सरकारकडून त्याबाबत काेणत्याही प्रकारे संपर्क करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.