'जगातील कोणतीही शक्ती भारताला विकसित होण्यापासून रोखू शकत नाही'- PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 17:56 IST2025-01-12T17:55:45+5:302025-01-12T17:56:15+5:30

PM Modi: 'तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल.'

'No power in the world can stop India from developing', PM Narendra Modi | 'जगातील कोणतीही शक्ती भारताला विकसित होण्यापासून रोखू शकत नाही'- PM मोदी

'जगातील कोणतीही शक्ती भारताला विकसित होण्यापासून रोखू शकत नाही'- PM मोदी

PM Modi in Viksit Bharat Young Leaders Dialogue 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (12 जानेवारी 2025) स्वामी विविकेनंद यांच्या जयंतीनिमित्त भारत मंडपम येथे आयोजित विकास भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी मोदींनी उपस्थित तरुणांना संबोधित करताना, देशातील तरुणांशी माझे मैत्रिचे नाते असल्याचे म्हटले. तसेच, देशातील युवा शक्तीच्या बळावरच भारत लवकरात लवकर विकसित होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

'भारताला विकसित देश होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'
पीएम मोदी पुढे म्हणतात, 'आज येथे उपस्थित तरुणांशी बोलत असताना मला विकसित भारताचे चित्रही दिसत आहे. विकसित भारतात आपल्याला काय पहायचे आहे? आपल्याला कोणत्या प्रकारचा भारत बघायचा आहे? जिथे चांगली कमाई आणि चांगल्या अभ्यासाच्या अधिकाधिक संधी असतील... फक्त बोलून आपण विकास करू का?... जेव्हा प्रत्येक निर्णयाचा निकष एकच असतो, जेव्हा आपल्या प्रत्येक पावलाची दिशा विकसित भारत असते, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला विकास करण्यापासून रोखू शकत नाही.'

'भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार'
'मी लाल किल्ल्यावरून 1 लाख नवीन तरुणांना राजकारणात आणण्याबाबत बोललो आहे. तुमच्या सूचना अंमलात आणण्यासाठी राजकारण हेही एक उत्तम माध्यम असू शकते. मला विश्वास आहे की, तुमच्यापैकी अनेकजण राजकारणातही उतरतील. विकसित भारताच्या या प्रवासात आपल्याला रोज नवनवीन ध्येये निश्चित करायची आहेत आणि ती साध्य करायची आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल. गेल्या 10 वर्षात देशाने 25 कोटी लोकांना रोजगार दिला आहे. आम्ही अनेकांना गरिबीतून बाहेर काढले. ज्या वेगाने आम्ही पुढे जात आहोत, तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण भारत गरिबीमुक्त होईल,' असंही मोदी यावेळी म्हणाले.

'भारत नियोजित वेळेपूर्वीच लक्ष्य गाठत आहे'
मोदी पुढे म्हणतात, 'आज अनेक क्षेत्रांमध्ये भारत निर्धारित वेळेपूर्वीच आपले लक्ष्य गाठत आहे. तुम्हाला कोरोनाची वेळ आठवत असेल, जग लसीबद्दल चिंतेत होते, असे म्हटले जात होते की, कोरोनाची लस बनवायला वर्षे लागतील, पण भारतीय शास्त्रज्ञांनी वेळेपूर्वी पहिली लस बनवून दाखवले. 1930 च्या दशकात अमेरिका गंभीर आर्थिक संकटात अडकली होती, तेव्हा अमेरिकेच्या लोकांनी ठरवले की, आपल्याला त्यातून बाहेर पडून वेगाने पुढे जायचे आहे. त्यांनी तो मार्ग निवडला आणि अमेरिका त्या संकटातून बाहेर तर आलाच, पण विकासाचा वेगही अनेक पटींनी वाढला.'

Web Title: 'No power in the world can stop India from developing', PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.