ना पुतीन, ना किम, ना जिनपिंग; व्हाईट हाऊस फॉलो करत असलेले एकमेव नेते ठरले PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 07:53 PM2020-04-10T19:53:19+5:302020-04-10T19:54:13+5:30

व्हाइट हाऊसचं ट्विटर अकाऊंट मोदी सोडल्यास इतर कोणत्याही जागतिक नेत्याला फॉलो करत नाही. व्हा

No Putin, no Kim, no Jinping; white house twitter handle follows pm narendra modi vrd | ना पुतीन, ना किम, ना जिनपिंग; व्हाईट हाऊस फॉलो करत असलेले एकमेव नेते ठरले PM नरेंद्र मोदी

ना पुतीन, ना किम, ना जिनपिंग; व्हाईट हाऊस फॉलो करत असलेले एकमेव नेते ठरले PM नरेंद्र मोदी

googlenewsNext

नवी दिल्लीः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात प्रसिद्ध व्यक्तींमधले एक आहेत. मोदी हे कायमच सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. सोशल मीडियावर प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरवर मोदींचे फॉलोअर्सही कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे मोदींना आता अमेरिकेतलं व्हाइट हाऊसदेखील फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अमेरिकेचं सत्ताकेंद्र असलेलं व्हाइट हाऊस फॉलो करत असलेले मोदी हे जगातील एकमेव नेते ठरले आहेत. व्हाइट हाऊसचं ट्विटर अकाऊंट मोदी सोडल्यास इतर कोणत्याही जागतिक नेत्याला फॉलो करत नाही. व्हाइट हाऊस फक्त १९ ट्विटर अकाऊंटला फॉलो करते. यातील १६ अमेरिकेतील आहेत, तर तीन भारतातील ट्विटर अकाऊंट आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदीं (@narendramodi)च्या वैयक्तिक अकाऊंटसह व्हाइट हाऊसचं ट्विटर अकाऊंट पीएमओ इंडिया (@PMOIndia), भारताचे राष्ट्रपती (@rashtrapatibhvn), यूएस दूतावास इंडिया (@USAndIndia) आणि यूएसएमधील भारताच्या (@IndianEmbassyUS) दूतावासाला फॉलो करते.

कोरोना व्हायरसशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेला भारतानं मोठी मदत केली आहे. अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची सर्वात अधिक गरज होती, तेव्हा भारतानं त्यांना ते उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळेच कदाचित आता व्हाइट हाऊसदेखील भारताचा फॉलोअर्स झाला असावा.
कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने मलेरियासाठी रामबाण ठरत असलेलं औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विनची निर्यात थांबविली होती. कारण हे औषध कोरोनाग्रस्तांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास फायदेशीर ठरत आहे.


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीवरून भारत सरकारने औषधावरील निर्यातबंदी हटवून हे औषध अमेरिकेत पाठवले आहे. भारत सरकारने हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीला परवानगी दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले होते. भारत-अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत. तसेच अमेरिका आणि भारत दोन्ही देश कोरोनाला थोपवण्यासाठी एकमेकांना सहकार्यसुद्धा करत आहेत. 
 

Web Title: No Putin, no Kim, no Jinping; white house twitter handle follows pm narendra modi vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.