दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडी १२ जुलैपर्यंत वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 04:45 PM2024-07-03T16:45:13+5:302024-07-03T16:56:30+5:30
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ केली आहे.
Arvind Kejriwal ( Marathi News ) :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने बुधवारी ३ जुलै न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवली. ईडीने त्यांना २१ मार्च २०२४ रोजी अबकारी धोरण प्रकरणात अटक केली होती. यासह, न्यायालयाने सीएम केजरीवाल यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला, यामध्ये त्यांनी वैद्यकीय मंडळाशी सल्लामसलत करताना त्यांच्या पत्नीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यावर न्यायालय ६ जुलै रोजी निर्णय देणार आहे.
“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी आणि सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयशी संबंधित खटल्यात जामीन मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. वकील रजत भारद्वाज म्हणाले की, सीएम केजरीवाल यांना बेकायदेशीर कोठडीत ठेवण्यात आले असून कायद्याचे पालन केले जात नाही.
सीबीआयच्या अटकेला आव्हान
या प्रकरणी गुरुवारी वकिलांनी सुनावणीसाठी अपील केले तेव्हा न्यायमूर्ती म्हणाले, "आधी न्यायाधीशांना कागदपत्रे पाहू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनावणी करू. २६ जून रोजी ईडीने अटक केल्यानंतर केजरीवाल यांनी सीबीआयच्या अटकेला आव्हान दिले आहे.
हे प्रकरण अद्याप उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने नोटीस बजावली असून याप्रकरणी सीबीआयकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणी १७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. त्यांना २० जून रोजी कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला, मात्र उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.