शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीला बंदी, FSSAI चा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 10:49 AM2020-08-10T10:49:05+5:302020-08-10T11:14:26+5:30
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील जंक फूड आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
एफएसएसएएआयने शाळेच्या परिसरातील 50 मीटरपर्यंत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व जाहिरातींवर बंदी घातली आहे. शालेय मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि पौष्टिक आहाराच्या दृष्टीने हे मोठं पाऊल उचललं गेल्याची माहिती मिळत आहे. एफएसएसएआय अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार नवीन तत्त्वे लागू करीत आहे. शालेय मुलांसाठी सुरक्षित, पौष्टिक आणि दर्जेदार आहार देणे हा त्याचा हेतू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील मुलांना यामुळे सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार मिळेल. जंक फूडमध्ये आरोग्याला अपायकारक असणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळेच शाळेच्या परिसरात 50 मीटरपर्यंत याची विक्री आता करता येणार नाही. या जंक फूडमध्ये साधारण पिझ्झा, बर्गर, कोल्डड्रिंक, चिप्स, फ्रेंच फ्राईज, समोसा, पेस्ट्री, सँडविच, ब्रेड पकोडे इत्यादींचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.
दिव्यांग विद्यार्थिनीला 2 गुण मिळाल्याचा सर्वांनाच बसला होता धक्का, पुनर्तपासणीच्या निर्णयाने कमाल केली... थेट 100 गुणांपर्यंत मजल मारली https://t.co/1XNW9pbF01#Exams2020#examresults
— Lokmat (@MiLOKMAT) August 10, 2020
2015 मध्ये दिल्ली हायकोर्टाने एफएसएसएएसआयला शाळेच्या कँटीनमध्ये जंक फूडच्या विक्रीवरील नियम घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शाळांमधील मुलांसाठी निरोगी अन्न पुरवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. शाळेत कँटीन सुरू करण्यासाठी एफएसएसएआय कडून परवाना घ्यावा लागेल. मुलांना सुरक्षित, चांगले भोजन मिळावे यासाठी शाळेच्या जागेची नियमित तपासणीही पालिका अधिकारी व राज्य प्रशासन करणार आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! विद्यार्थ्यांना झाली कोरोनाची लागणhttps://t.co/iGEGUnWhvO#coronavirus#CoronaUpdates#COVID19#schools
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी
शाब्बास पोरी! सर्व विषयात जबरदस्त गुण पण गणितात मात्र 2, पुनर्तपासणीत मिळाले पैकीच्या पैकी
"राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचं नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला बनवा", काँग्रेस नेत्याचा सल्ला
माणुसकीला काळीमा! नवजात बाळाला स्मशानभूमीत जिवंत पुरलं, रडण्याचा आला आवाज अन्...
बापरे! मुलाने घरातून चोरले गहू, वडिलांनी दिली भयंकर शिक्षा
घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य
CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन
CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह