CoronaVirus News: उकाड्यात कोरोना संक्रमणाचा वेग मंदावतो?; 'या' शहरातल्या आकडेवारीतून मिळालं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 03:02 PM2020-05-22T15:02:31+5:302020-05-22T15:04:22+5:30
CoronaVirus News: दिल्लीतील तापमान ४० अशांच्या पुढे; काल ४४ अंश तापमानाची नोंद
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख २० हजारांच्या आसपास पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होत आहे. फेब्रुवारीपासून देशात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. त्यावेळी उकाडा वाढल्यावर कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग मंदावतो, असा दावा करण्यात येत होता. उकाडा वाढल्यावर कोरोना विषाणू फार काळ जिवंत राहणार नाही. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, असं म्हटलं जात होतं. मात्र दिल्लीत हा दावा फोल ठरताना दिसत आहे.
राजधानी दिल्लीचं तापमान सध्या ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. मात्र सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे पाचशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज तर दिल्लीत कोरोनाचे ६०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. उष्णता वाढल्यानंतर कोरोनाचा विषाणू फार काळ जिवंत राहू शकत नाही, हा दावा दिल्लीत पूर्णपणे फोल ठरला आहे. गुरुवारी दिल्लीत ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद होऊनही गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६६० रुग्ण सापडले आहेत.
एप्रिलपर्यंत दिल्लीतल्या कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग तुलनेनं कमी होता. मात्र मे महिना सुरू होताच कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग वाढला. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दर दिवशी कोरोनाचे सरासरी ३०० रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर हाच आकडा ४०० च्या घरात पोहोचला. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून दररोज कोरोनाचे ५०० हून जास्त रुग्ण सापडत आहेत. दिल्लीतल्या कोरोना बाधितांचा आकडा १२ हजारांहून जास्त आहे.
वाळवंटी भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे दिल्लीतलं तापमान वाढलं आहे. पुढच्या आठवड्यात दिल्लीतलं तापमान आणखी वाढणार आहे. सफदरजंग भागातलं तापमान ४२.७ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. पालममध्ये ४४.१, आया नगरमध्ये ४३.२, नजफगढमध्ये ४२.२ आणि स्पोर्ट्स संकुल परिसरात ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका
"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"
भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....